Koshyari मोदींच्या स्वागताला गेले, पण कार्यक्रमाकडे पाठ; राज्यपाल का गैरहजर?
Governor Bhagat Singh Koshyari is absent in PM Modi event: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज (10 फेब्रुवारी) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. इथे त्यांनी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचं (Vande Bharat Train) लोकार्पण केलं. तसंच बोहरा मुस्लिम समाजाच्या एका कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींचा […]
ADVERTISEMENT

Governor Bhagat Singh Koshyari is absent in PM Modi event: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज (10 फेब्रुवारी) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. इथे त्यांनी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनचं (Vande Bharat Train) लोकार्पण केलं. तसंच बोहरा मुस्लिम समाजाच्या एका कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींचा हा गेल्या काही दिवसातील दुसरा मुंबई दौरा आहे. दरम्यान, आजच्या मोदींच्या दौऱ्यापेक्षा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याविषयीच अधिक चर्चा रंगली होती. (governor bhagat singh koshyari went to welcome pm modi but turned his back on the programme why was governor absent)
पंतप्रधान मोदी हे 19 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईत मेट्रो आणि इतर काही विकासकामांचं उद्घाटन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतापासून ते कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सोबतच होते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या आजच्या संपूर्ण कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी हे कुठेही दिसून आले नाही. ज्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी का नव्हते हजर?
जेव्हा पंतप्रधान मोदी हे मुंबई दाखल झाले त्यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी स्वत: राज्यपाल हे हजर होते. यावेळी इतरही काही नेतेमंडळी हजर होते. ज्यांची ओळख देखील कोश्यारींनी पंतप्रधान मोदींना करून दिली.
‘मोदीजी आमचं सरकार तुमच्याच आशीर्वादाने बनलंय’, CM शिंदे काय बोलून गेले?