‘आजोबांनी चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय..’, राणेंची शरद पवारांवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nilesh Ranes criticism of Rohit Pawar and Sharad Pawar: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांची थेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण आता शरद पवारांनंतर पवार कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने क्रिकेटच्या राजकारणात प्रवेश केला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणेंनी (Nilesh Rane) शरद पवारांसह रोहित पवारांवर जहरी टीका केली आहे. (grandpa brought cheerleaders in cricket nilesh ranes criticism of sharad pawar)

ADVERTISEMENT

‘अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.’ अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबीय हे सातत्याने पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच आता निलेश राणेंनी पुन्हा एकदा रोहित पवारांच्या निवडीनंतर त्यांच्यासह शरद पवारांवर देखील टीका केली आहे.

हे वाचलं का?

Rohit Pawar महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष; किरण सामंत उपाध्यक्षपदी

पाहा निलेश राणेंचं नेमकं ट्विट काय

ADVERTISEMENT

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया.

ADVERTISEMENT

बारामती अॅग्रोला क्लिनचीट! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना दिलासा

आता निलेश राणे यांच्या या टीकेला रोहित पवार नेमकं कशा पद्धतीने उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रोहित पवारांची कशी झाली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड?

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर 16 सदस्यीय कमिटीची रविवारी दुपारी एक बैठक पार पडली. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. रोहित पवार यांच्याविरोधात कोणीही अर्ज भरला नव्हता त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची निवड झाली.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षांशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही याच वेळी निवड करण्यात आली. यात सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT