जळगाव अपघात : लग्नाचे कपडे विसरणं पडलं महागात, कारच्या ताशी ११० वेगाने केला घात, लग्नघरी शोककळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर टाकळीजवळ झालेल्या भीषण अपघाता तिघांना जागेवरच आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघातानंतर दुर्दैवी कहाणी आता समोर आली आहे. भुसावळवरुन औरंगाबादला भावाच्या लग्नासाठी निघालेल्या भावाचा चुलत बहीण आणि ब्युटीशियनसह जागेवरच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

लग्नाचे कपडे घरी विसरल्यामुळे परतला होता माघारी –

भुसावळमधील गोविंदा सैंदाणे यांचा मोठा मुलगा पंकज हा जयपूर येथे राहतो तर लहान मुलगा पुण्यात अभियंता आहे. शुक्रवारी औरंगाबादेतील मथुरा लॉन्समध्ये लहान भाऊ राजनचा विवाहसोहळा ठरला होता. गुरुवारी सायंकाळी हळद समारंभ असल्याने सकाळीच भुसावळहून वऱ्हाडी चार वाहनांतून रवाना झाले. मोठा भाऊ पंकज सैंदाणे इंडिगो कारने निघाला होता. मात्र लग्नासाठीचे कपडे घरीत राहिल्याने तो माघारी फिरला.

हे वाचलं का?

पुण्याकडे येेणाऱ्या कारचा अपघातात चक्काचूर! पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

हे माघारी फिरणं एवढ्या महागात पडेल याचा कोणीही विचार केला नव्हता. पंकजने कपडे सोबत घेऊन पुन्हा औरंगाबादच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. यादरम्यान जामनेरजवळ एका अज्ञात ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. हा अपघात इतका तीव्र होता की त्यात पंकज, त्याची चुलत बहीण प्रतिभा आणि ब्युटीशियन सुजारा हिवरे या जागीच ठार झाल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ताशी ११० वेगाने कार चालवत होता पंकज?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादला लवकर पोहचावं यासाठी पंकज हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा कारचा वेग जर नियंत्रणात असता तर हा अपघात टळला असता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतू या अपघातामुळे लग्नघरात शोकाकूल वातावरण तयार झालं असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT