ही 'ब्राउन शुगर भाभी' आहे तरी कोण? माहेर आणि सासरची लोकही धंद्यात! मुलींच्या टीमकडून सप्लाय...

मुंबई तक

ब्राउन शुगर भाभी म्हणून ओळखली जाणारी रुबी सिंग उत्तर प्रदेशातून ब्राउन शुगर आणायची आणि रांचीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ती पुरवायची. तिच्या कुटुंबातील सदस्यही या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी होते.

ADVERTISEMENT

ब्राउन शुगर भाभी आहे तरी कोण? माहेर आणि सासरची लोकही धंद्यात!
ब्राउन शुगर भाभी आहे तरी कोण? माहेर आणि सासरची लोकही धंद्यात!
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ब्राउन शुगर भाभीची राज्यात दहशत

point

ड्रग्ज व्यवसायात मुलींचाही होता सहभाग

point

ब्राउन शुगर भाभी कायद्याच्या कचाट्यात कशी सापडली?

Bihar News: बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील कारगर गावाच्या रेल्वे स्टेशनजवळ एक महिला राहत होती जिच्या नावाने लोक थरथर कापत होते. तिचे नाव रुबी सिंग असून परिसरातील सर्वजण तिला 'ब्राउन शुगर भाभी' म्हणून ओळखत होते. गेल्या 10 वर्षांपासून रुबी ड्रग्जचा बेकायदेशीर व्यवसाय करत होती. तिच्या व्यवसायाचे जाळे जवळपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेले होते. यामध्ये केवळ पुरुषच नव्हे तर मुलीही सहभागी होत्या. पोलिसांनी त्यांचा तपास सुरु ठेवला आणि सखोल चौकशीनंतर बऱ्याच धक्कादायक बाबी समोर आल्या. 

घरातून ब्राउन शुगर म्हणजेच ड्रग्जचा व्यवसाय करणारी रुबी सिंग उर्फ ​​ब्राउन शुगर भाभी आता तुरुंगात आहे. रुबी उत्तर प्रदेशातून ब्राउन शुगर आणायची आणि त्यात इतर मादक पावडर मिसळायची. हे ड्रग्ज जवळच्या जिल्ह्यांमध्ये पाठवले जायचे. बिहारची रहिवासी असलेल्या रुबीच्या ड्रग्जचा व्यवसाय झारखंडमधील रांचीच्या जवळपास प्रत्येक भागात तिचा पसरला होता. 

बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनजवळील कारगर गावातील रहिवासी असलेली रूबी गेल्या 10 वर्षांपासून ड्रग्ज व्यवसायात आहे. तिचा भाऊ पिंटू साह, धाकट्या बहिणीचा पती प्रिन्स आणि मेहुणा सूरज कुमार साह यांच्यासोबत तिचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायात गुंतलेले आहे. बिहारमध्ये राहत असताना ती रांचीपर्यंत तिचा व्यवसाय चालवत होती.

20 हून अधिक गुन्हे दाखल 

पोलिसांच्या माहितीनुसार, रांचीच्या जवळपास प्रत्येक भागातील व्यापारी रुबीकडून ब्राऊन शुगर खरेदी करायचे. ब्राऊन शुगरचा व्यवसाय करताना तिच्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. पण तरीही तिने तिच्या व्यवसाय थांबवला नाही. रुबीच्या विरोधात रांचीच्या सुखदेव नगर पोलिस ठाण्यात 13, कोतवाली मध्ये 2, लोअर बाजारात 2, तसेच गोंडा, खेलगाव, जगन्नाथपूरचे पुंडग आणि अर्गोरा अशा अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.