एका नावाच्या आधारावर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना केली अटक
मुंबई रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात अंधुकसे पुराने हाती असतानाही रेल्वे पोलिसांनी जिद्दीने या प्ररकरणाचा पाठपुरावा करत आरोपीला गजाआड केलं आहे. पीडित मुलीवर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु असून रेल्वे पोलीस या मुलीला भविष्यात तिच्या पायावर उभं राहता यावं यासाठीही प्रयत्न […]
ADVERTISEMENT
मुंबई रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर शाररिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात अंधुकसे पुराने हाती असतानाही रेल्वे पोलिसांनी जिद्दीने या प्ररकरणाचा पाठपुरावा करत आरोपीला गजाआड केलं आहे. पीडित मुलीवर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु असून रेल्वे पोलीस या मुलीला भविष्यात तिच्या पायावर उभं राहता यावं यासाठीही प्रयत्न करणार आहेत.
जाणून घ्या काय आहे प्रकरण?
७ ऑगस्टला पीडित मुलगी एका महिला कॉन्स्टेबलला दादर स्टेशनवर बसलेली दिसली. मुलीकडे पाहिल्यानंतर तिची मानसिक अवस्था योग्य नसल्याचं महिला कॉन्स्टेबलला लक्षात आलं, ज्यानंतर तिने या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं. वैद्यकीय तपासणीत या मुलीवर शाररिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. परंतू त्यावेळी भेदरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या मुलीने काहीही जबाब दिला नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दोन दिवसांनी पोलिसांना पहिला अशेचा किरण दिसला –
अखेरीस दोन दिवसांनी पीडित मुलीने अजय या व्यक्तीचं नाव घेत वसई सब-वे भागातील टेलर शॉपमध्ये आपल्यावर अत्याचार झाल्याचं सांगितलं. यानंतर आणखी दोन व्यक्तींनी आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने सांगितलं. या माहितीवरुन रेल्वे पोलिसांनी FIR दाखल केला. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकांची स्थापना करुन त्यांना वसई-नायगाव भागात तपासाकरता पाठवलं. रेल्वे पोलिसांचे DCP प्रदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
पोलीस तपासाला सुरुवात –
ADVERTISEMENT
रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकांची स्थापना केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पहिल्या ३ दिवसांमध्ये या पथकाने १०-१२ अजय नामक व्यक्तींची चौकशी केली. याचसोबत वसई रेल्वे स्थानकानजिक असलेल्या रिक्षावाल्यांनाही पीडित मुलीचा फोटो दाखवून पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला. परंतू वसई सारख्या शहरात केवळ अजय या एका नावाच्या आधारावर तपास कसा करायचा हा प्रश्न पोलिसांसमोर होता.
कालांतराने पोलिसांनी आपल्या तपासाचा परिघ वाढवत वसईच्या आजुबाजूच्या भागांत चौकशी सुरु केली. यावेळी नायगावच्या राजौरी भागात या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतलं. यापैकी एका व्यक्तीने पीडित मुलीचा फोटो दाखवल्यानंतर तिला तात्काळ ओळखलं. त्याच्या चेहऱ्यावरील बदलेले हावभाव पाहून पोलिसांना त्या व्यक्तीवरचा संशय वाढला आणि या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.
पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक
पुढे पोलीस तपासात पीडित मुलीच्या फोटोला पहिल्यांदा ओळखणारा व्यक्ती या गुन्ह्यातला एक आरोपी असल्याचं सिद्ध झालं. ज्यानंतर पुढील दोन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान पीडित मुलीविषयी धक्कादायक माहिती समोर आली. “पीडित मुलगी ३ वर्षांची असताना तिची आई वारली. नोव्हेंबर २०२० मध्ये सावत्र आईनेही पीडित मुलीच्या बाबांना सोडून दिलं. ज्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर ही मुलगी एकटीच राहत होती. आजुबाजूची लोकं यावेळी तिला जेवण देण्यापासून मदत करत होती.
आरोपी अजय हा ट्रक ड्रायव्हर असून त्याने पीडित मुलीला जेवण द्यायचं अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. यानंतर अजयच्या आणखी दोन मित्रांनीही या मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणात रेल्वे पोलीस गेल्या महिन्याभराच्या काळात पीडित मुलगी कुठे-कुठे गेली होती याचं सीसीटीव्ही तपासत आहेत. ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी आरोपीचं मोबाईल लोकेश कुठे आहे याचाही तपास पोलीस अधिकारी करत आहेत. पीडित मुलीची तब्येत सुधारल्यानंतर ती या प्रकरणात आपला जबाब नोंदवेल अशी आशा पोलिसांना आहे अशी माहिती प्रदीप चव्हाण यांनी दिली.
या मुलीला सांभाळणारं कोणीही नसल्यामुळे पोलीस या मुलीचं पुनर्वसन एखाद्या संस्थेमार्फत होतं का याचाही प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT