गुजरात: भल्या पहाटे सुरतमध्ये जीवघेणी दुर्घटना, 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू; 25 जणांची प्रकृती चिंताजनक

मुंबई तक

सूरत: गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी सकाळी-सकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील तब्बल 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. येथील प्रिंटिंग मिलमध्ये सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण सूरतमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सूरत: गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी सकाळी-सकाळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याने मिलमधील तब्बल 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे.

येथील प्रिंटिंग मिलमध्ये सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण सूरतमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकरचालक विषारी रसायन टाकत होते. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. त्यामुळे जवळच असलेल्या छपाई मिलचे कर्मचाऱ्यांना श्वसनास त्रास सुरु झाला आणि त्यात सहा कामगारांचा हकनाक बळी गेला. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचून आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या घटनेनंतर 25 हून अधिक कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वायू गळतीनंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती. प्राथमिक माहितीनुसार, वायू गळतीनंतर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर : ड्रेनेजमध्ये गुदमरुन ४ कामगारांचा मृत्यू, भाजप आमदाराच्या मुलासह ६ जणांना अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp