Crime: 50 फूट उंच स्कायवॉकला लटकून गळफास, रेल्वे स्टेशनजवळ नेमकं काय घडलं?
Kalyan Railway Station Suicide Case: कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरातील स्कायवॉकला (Skywalk) लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण पसरलेलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहला खाली उतरून तात्काळ शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. (hanged […]
ADVERTISEMENT

Kalyan Railway Station Suicide Case: कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरातील स्कायवॉकला (Skywalk) लटकून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण पसरलेलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहला खाली उतरून तात्काळ शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. (hanged himself from a 50 feet high skywalk what really happened near kalyan railway station)
तरुणाने जीवाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विठ्ठल मिसाळ असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकला लटकून विठ्ठलने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. पहाटे स्टेशन परिसरात असलेल्या काही जणांनी एक मृतदेह लटकताना पाहिला आणि येथे घबराटीचं वातावरण पसरलं. त्यानंतर काही जणांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
धक्कादायक! न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यात १९ वर्षीय तरूणाची आत्महत्या










