कृषी पंपांची वीज तोडल्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक, महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे इंदापूर तालुक्यात गावोगावी आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आता भाजपाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील चांगलेच आक्रमक झालेत. महावितरणच्या दारातच ठिय्या मांडून पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी दिवसभर हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरु […]
ADVERTISEMENT
इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे इंदापूर तालुक्यात गावोगावी आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने आता भाजपाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील चांगलेच आक्रमक झालेत. महावितरणच्या दारातच ठिय्या मांडून पाटील यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ADVERTISEMENT
शनिवारी दिवसभर हर्षवर्धन पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरु केलं. महावितरणचे अधिकारी व आंदोलन कर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा न झाल्याने आंदोलनकर्ते आक्रमक होऊन हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणच्या कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
महावितरणचे अधिकारी हे शेतकरी व आंदोलनकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. गेली दहा दिवसांपासून महावितरणने शेतकऱ्यांची लाईट तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत दोन दिवसांपूर्वी भवानीनगर, बावडा, कळस आणि राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. मात्र, तरीदेखील प्रशासन शेतकऱ्यांबाबत थोडीदेखील सहानुभूती दाखवत नसल्याने अखेर भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
हे वाचलं का?
आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होत नाही. तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT