Rain Aelrt : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे ढग; ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार, ‘यलो अलर्ट’ जारी
राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, ठाण्यासह कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होणार असल्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक के.एस. होसळीकर यांनी ट्वीट करून राज्यातील पावसाबद्दलची माहिती दिली आहे. 13 ते […]
ADVERTISEMENT
राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, ठाण्यासह कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होणार असल्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
भारतीय हवामान विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक के.एस. होसळीकर यांनी ट्वीट करून राज्यातील पावसाबद्दलची माहिती दिली आहे. 13 ते 16 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
13 नोव्हेंबर… कोणत्या जिल्ह्यात पाऊस कोसळणार?
हे वाचलं का?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आज (13 नोव्हेंबर) राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
14 नोव्हेंबर…
ADVERTISEMENT
पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड.
ADVERTISEMENT
15 नोव्हेंबर…
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर.
16 नोव्हेंबर…
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, यलो अलर्टही जारी करण्यात आलेला आहे.
12 Nov:
पुढच्या 5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता. 12 ते 16 नोव्हेंबर, राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणी संलग्न मराठवाडा भाग प्रभावीत असण्याची शक्यता. काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता.
12 Nov, S Konkan & S Madhya Mah TS possibilities. @RMC_Mumbai
– IMD pic.twitter.com/S63d7Turbt— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 12, 2021
तामिळनाडूला पावसाचा तडाखा
मागील दोन-तीन दिवसांपासून तामिळनाडूच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसाला आहे. चेन्नईतही पावसाने हाहाकार उडाला असून, तामिळनाडूतील अनेक भागांमध्ये जनजीवन कोलमडलं आहे. चेन्नईतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT