Rain Update : कोसळधार सुरूच! CM Uddhav Thackeray यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोसळधार सुरूच आहे. खासकरून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आणि मुसळधार पावसाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसंच बचावकार्य करणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोसळधार सुरूच आहे. खासकरून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आणि मुसळधार पावसाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसंच बचावकार्य करणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. यावेळी बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली.