Mumbai Rains Update : मुसळधार पावसाने मुंबईला झोपडलं, रेल्वे वाहतूकही उशीराने सुरु
मुसळधार पावसाने आज मुंबईला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह अरबी समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या ठाणे, रायगड आणि कोकणाच्या काही भागांमध्ये पुढचे काही तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबई शहर ते उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. दादर हिंदमाता, सायन, कुर्ला, चेंबूर, दहिसर अशा अनेक […]
ADVERTISEMENT
मुसळधार पावसाने आज मुंबईला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह अरबी समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या ठाणे, रायगड आणि कोकणाच्या काही भागांमध्ये पुढचे काही तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबई शहर ते उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे.
ADVERTISEMENT
दादर हिंदमाता, सायन, कुर्ला, चेंबूर, दहिसर अशा अनेक भागांमध्ये रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेलाही बसला असून कुर्ला-विद्याविहार भागात ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यामुळे लोकल २० ते २५ मिनीटं उशीराने धावत आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ही उशीराने सुरु आहे. ट्रान्स हार्बर सेवा मात्र सुरुळीत सुरु आहे.
हे वाचलं का?
जाणून घेऊयात मुंबईच्या विविध भागांत पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती…
उपनगरातील कांजुरमार्ग परिसरात पावसामुळे मॅनहोलवरची झाकणं निघून रस्त्यावरचे बॅरिकेड्स पडलेले पहायला मिळाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या पावसाचा फटका सकाळी रस्ते वाहतुकीलाही बसला. अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांची वाहनं बंद पडली. त्यातच मुसळधार पाऊस आणि रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाट काढून गाडी चालवताना अनेक नागरिकांना त्रास झाला.
मुंबईचा सायन भाग हा नेहमी पाणी साचण्यासाठी ओळखला जातो. काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे या भागातल्या लोकांसाठी पुन्हा एकदा खडतर परिस्थिती तयार झालेली पहायला मिळाली.
जी परिस्थिती मुंबईच्या शहरी भागात तीच परिस्थिती दहीसर आणि इतर उपनगर भागात पहायला मिळाली. दहीसर नाका परिसरात पावसाचं पाणी रस्त्यात साचून तयार झालेली परिस्थिती…
दहीसर सब वे मध्ये पाणी साचून तयार झालेली परिस्थिती. या पाण्यात अनेकांची वाहनं बंद पडली.
मुंबईच्या गोरेगाव येथील हब मॉल परिसरात पाणी रस्त्यावर साचून तळं तयार झालं आहे.
अंधेरी सब बे देखील पावसाच्या संततधारेमुळे जलमय झालेला पहायला मिळाला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT