निम्म्या महाराष्ट्राला पाऊस झोडपणार; पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अर्लट’

मुंबई तक

आंध्र प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात आला आहे. मान्सून माघारी परतला असला तरी देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आंध्र प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे ढग गडद झाले आहेत. राज्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देेण्यात आला आहे.

मान्सून माघारी परतला असला तरी देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात पावसानं प्रचंड थैमान घातलं. आता महाराष्ट्रातही आज, उद्या (21 व 22 नोव्हेंबर) मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पूर्व-मध्य व पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून, मच्छिमारांनाही दोन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून, राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशात पावसाचे 25 बळी

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत पावसाने हाहाकार उडाला आहे. आंध्र प्रदेशला पावसाने जबर तडाखा दिला असून, आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतही मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा आणि अनंतपुरमु जिल्ह्यात झालेल्या पावसाने जनजीवन कोलमडलं. 25 लोकांचा मृत्यू झाला असून, 17 जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांनी दिली.

अनंतपूर जिल्ह्यात नदीच्या पात्रात अडकलेल्या नागरिकांची भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. अंगावर शहारे आणणाऱ्या या मदतकार्य मोहिमेचा व्हिडीओही समोर आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp