महाराष्ट्र पावसाच्या ‘रडार’वर! चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह धो-धो पावसाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुढील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD चे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळकाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे, असा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हटलं आहे होसाळीकर यांनी?

पुढचे चार ते पाच दिवस पराज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांचा गडग़डाट होत असताना आणि विजा चमकत असताना घराबाहेर टाळा असंही आवाहन होसाळीकर यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

9 ऑक्टोबरला मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

10 ऑक्टोबरला पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

11 ऑक्टोबरला पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT