Mumbai Rains: मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई (Mumbai) आणि उपनगरामध्ये मागील 24 तासापासून पावसाचा (Rain) जोर कायम आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुलुंड (Mulund) येथे भिंत कोसळून एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नुकतीच समोर आली आहे. काल दिवसभर मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) कोसळत होता त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुलुंडमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

याबाबत मुंबई महापालिकेच्या स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिममधील वायदे चाळ येथील एक सरंक्षक भिंत अचानक कोसळली. जेव्हा ही भिंत कोसळली तेव्हा दिलीप वर्मा (वय 35 वर्ष) हे शेजारीच उभे होते. त्यामुळे ते ढिगाऱ्याखाली अडकले. दरम्यान, त्यांना तात्काळ ढिगाऱ्याखालून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सातारा : कराडमध्ये अतिवृष्टी, अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, मुंबई आणि उपनगरात पडझडीच्या एकूण पाच घटना दिवसभरात घडल्या असल्याचं समजतं आहे. त्यापैकी शहरात 2, पूर्व उपनगरात 2 आणि प. उपनगरात 1 अशा एकूण 5 ठिकाणी घराचा, भितींचा काही भाग कोसळल्याचं समोर आलं आहे.

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज

ADVERTISEMENT

कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापूर : धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील गेल्या 24 तासात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. वसई-विरार आणि नालासोपारा पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

सकाळपासून या तिन्ही शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Vasai-Virar मध्ये पावसाची दमदार बॅटींग, अनेक सखल भागांत पाणी साचलं

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार

एकीकडे कोल्हापुरात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना सातारा जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. कराड तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला असून संपूर्ण तालुक्यात सरासरी ८८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कराडमधील सुपनी, कोपर्डे हवेली मंडल या भागात तर पावसाने जवळपास शतक गाठलं. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यानंतरही पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे अनेक गावांमधली जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. कराड, मलकापूर, सैदापूर, उंब्रज, शेणोली, उंडाळे, काले, सुपने या सर्व भागांमध्ये ८५ ते ९९ मि.मी. च्या घरात पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी म्हणून ओळख असलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे पंचगंगेची पातळी १२ फुटांनी वाढून २५ फुटापर्यंत पोहचली आहे. कोल्हापूरच्या गारगोटी मार्गावरील माजगावच्या पर्यायी पुलाचा रस्ताही या पावसामुळे वाहून गेला आहे. अजुनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT