Lok Sabha : 'अजितचा स्वभाव मला माहितीय...', शरद पवार 'हे' काय बोलून गेले?
Sharad Pawar on Ajit Pawar : बारामतीत पवार विरूद्ध पवार लढाई होत आहे. त्यात आता महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार विरूद्ध पवार संघर्ष चांगलाच पेटला आहे. हा संघर्ष लोकसभेच्या प्रचारातही पाहायला मिळाला होता. त्यामुळेच बारामतीत (Baramati) पवार विरूद्ध पवार लढाई होत आहे. त्यात आता महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. (sharad pawar big statement on ajit pawar baramati lok sabha 2024 ncp splits maharashtra politics
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत शरद पवारांना जर राजकारणापलिकडे जाऊन अजित पवारांनी मदतीसाठी हात पुढे केला, तर तुम्ही त्यांना हात देणार का? असा सवाल करण्यात आला होता. यावर शरद पवारांनी स्पष्टच उत्तर दिलं. ''असा प्रश्नच येणार नाही. अजितचा स्वभाव मला माहिती आहे. तो कधी कुणासमोर हात पसरणार नाही'', असे शरद पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा : 'दुपार झाली, उठले असतील आणि सुपारी...', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा!
भापजमुळे राष्ट्रवादीत असा संघर्ष झाला का? असा सवाल शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, 'भाजपला हे हवचं होतं. मी या राज्यात हा पक्ष जो उभा केला. या सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावला. त्यातून आम्ही एक शक्तीकेंद्र तयार केलं. आमचे सगळे लोक 1999 पासून अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यातून काही लोकांना मंत्रीपद मिळालं, काहींना तर तीन वेळ उपमुख्यमंत्रीपद मिळालं. मात्र त्यांनी आता वेगळी भुमिका घेतली. आणि रस्ते वेगळे झाले. आता बघुयात पुढे काय होतं', असे शरद पवारांनी सांगितलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा : 'फडतूणवीसचे नोकर नाही...', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका
महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? सुरूवातीला चित्र असं होतं की ही एकतर्फी निवडणूक होईल. पण ही निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही.आणि जो एकत्रितपणाने लढतो त्याच्या पाठीमागे लोकांचा पाठींबा राहिल, असे शरद पवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT