Lok Sabha : संजय राऊतांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut, Lok Sabha 2024 : अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके याच्या प्रचारासाठी 8 मे रोजी क्लेरा ब्रस मैदानावर सभा घेण्यात आली होती.या सभेला शिवसेना नेते संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना संजय राऊत नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला होता.
ADVERTISEMENT
Sanjay Raut, Lok Sabha 2024 : शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अहमदनगरमध्ये संजय राऊतांवर (Sanjay Raut) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद मोदी (Narendra Modi) यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. (ahmednagar lok sabha election 2024 case has been register against sanjay raut lok sabha 2024 narendra modi)
ADVERTISEMENT
अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके याच्या प्रचारासाठी 8 मे रोजी क्लेरा ब्रस मैदानावर सभा घेण्यात आली होती.या सभेला शिवसेना नेते संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना संजय राऊत नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे, त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. पाहा इतिहास त्यामुळेच तीजी माती आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी औरंगजेबचा जन्म नरेंद मोदीच्या गावात झाला आहे. इतिहास पाहा दावत नावाचे गाव आहे, अहमदाबादच्या बाजुला तिकडे औरंगजेब जन्माला आला आहे गुजरामध्ये, असे राऊत म्हणाले होते. म्हणूनच ते आपल्याशी औरंगजेबी वृत्तीने वागतायत, सत्तावीस वर्षं तो औरंगजेब महाराष्ट्रात जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडुन त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तु कोण आहेस, असा सवाल करत टीका करण्यात आली होती.
हे ही वाचा : मुंबई Tak चावडी : 'भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देशासोबत गद्दारी...'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी भाषेत उल्लेख करून निवडणुक प्रचार सभेत गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रक्षोभक भाषण करून, पंतप्रधानना गाडण्याची भाषा केल्या प्रकरणी आता कोतवाली पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात 580/2024, भादंवि कलम 17(क),506,लोकप्रतिनिधी अधिनियम 123(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा : 'शरद पवारांनी मोठ्या चुका केल्या'; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT