'पवारांना त्यांच्या चुकांची फळं भोगावी लागतायत'; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Prithviraj Chavan on Sharad pawar : लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. यासर्वात दररोज एकमेकांवर नवनवीन आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. तसंच मुलाखतीतून मोठे गौप्यस्फोट होतात. आताही मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांवर केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होतेय. 'पवारांना त्यांच्या चुकांची फळं भोगावी लागतायत' असं पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत म्हणाले आहेत. ते असं का बोलले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (prithviraj chavan why said that sharad Pawar has to suffer the consequences of his own mistakes)

'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तवाहिनीला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य केलं. अजित पवार आणि शरद पवारांचा फोटो पाहताच पृथ्वीराज चव्हाणांनी पवारांची ही चूक लक्षात आणून दिली.

हेही वाचा :  मुंबईतून PM मोदींचं शरद पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले...

शरद पवारांनी मोठ्या चूका केल्या- पृथ्वीराज चव्हाण

मुलाखतीत ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो दाखवण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, 'पवार साहेबांनी खूप मोठ्या चूका केल्या. अजित पवारांनी मी मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला, नंतर अनेकवेळा असं केलं. पण, दरवेळेस त्यांना पुन्हा बोलावून शरद पवार आणखी मोठं पद देत गेले. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत.' असं ते स्पष्टच बोलले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : PM Modi Mumbai: ठाकरे-पवार रडारवर.. PM मोदी मुंबईकरांना काय म्हणाले?

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातील विजयाची खात्री

यानंतर त्यांना साताऱ्यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा ते म्हणाले, 'मला एक वाईट वाटतं की, आज त्यांच्याकडे छत्रपती हे पद आहे. ते फार मोठं काही करू शकले असते, संपूर्ण भारतात छत्रपतींचा वारस म्हणून त्यांचं नाव झालं असतं. पण त्याचा उपयोग त्यांनी केला नाही. संसदेत काही केलं नाही, मतदारसंघात काही केलं नाही. त्यामुळे आता जेव्हा निकाल लागेल तेव्हा समजेल. आम्ही नक्कीच जिंकणार.' अशा शब्दात त्यांनी साताऱ्यातील विजयाची खात्री दिली. 

हेही वाचा : Lok Sabha 2024 : "माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय", सोनिया गांधी झाल्या भावूक

महाराष्ट्रात स्थिती काय?

पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंदाजानुसार, 'महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीन-तीन पक्षांची आघाडी आहे. असं पहिल्यांदाच झालं आहे. आतापर्यंत दोनच पक्ष युती-आघाडीत होते. जागावाटपात काही अडचणी आल्या, त्यांना जास्त आल्या. आम्ही सांगली-मुंबईत तडजोडी केल्या, पण एकंदरीत फार मोठा वाद नव्हता. प्रचार मात्र एकदिलाने केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत निगेटिव्हिटी आहे, पक्ष फोडणं, 50 खोके असेल. मतदारांमध्ये विश्वासघाताची भावना आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीला सहानुभूती आहे. मी सुरुवातीला 25 ते 30 जागा म्हणत होतो, पण आज तो आकडा मी 32 ते 35 वर नेलेला आहे. पवार-जयंत पाटीलही तोच आकडा सांगतात,' असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.   

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT