हेमांगी कवीची ‘चाळीशी’तील पोस्ट चर्चेत; म्हणते ‘खोटी वाटणारी गोष्ट खरी ठरली की राव’

मुंबई तक

विविध विषयांवर मतं मांडणारी अभिनेत्री हेमांगी कवीच्या एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्ताने हेमांगी कवीने ही पोस्ट लिहिली असून, तिने या निमित्ताने तिच्या पंचविशीतील एका आठवणीली उजाळा दिला आहे. याचबरोबर हेमांगीने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या चाहत्यांचे आभार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विविध विषयांवर मतं मांडणारी अभिनेत्री हेमांगी कवीच्या एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्ताने हेमांगी कवीने ही पोस्ट लिहिली असून, तिने या निमित्ताने तिच्या पंचविशीतील एका आठवणीली उजाळा दिला आहे. याचबरोबर हेमांगीने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या चाहत्यांचे आभार मानताना हेमांगीने तिच्या पंचविशीत ऐकलेला किस्साही सांगितला. त्यामुळे ‘चाळीशी’ पूर्ण केलेल्या हेमांगीची पोस्ट चर्चेत आली आहे.

हेमांगी काय म्हणाली?

हेमांगीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘तुमच्या शुभेच्छांसोबत, ‘चल, काही काय? ४०?’ ‘कुठल्या अँगलने ४०?’ ‘आईय्या अजूनही किती लहान दिसत्येस’ ’२१ वर्षांची असशील’ ‘एज इज जस्ट अ नंबर’ अरे यार, ४०? हीचं काय करायचं? ’१४ चं ४१ चुकून लिहिल असशील… बरोबर कर’ वगैरे वगैरे… हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल; कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे, असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव! ही ही ही…’

हे वाचलं का?

    follow whatsapp