कल्याण : ‘मी शिवसेना बोलतेय’ देखाव्याला कोर्टाची परवानगी; गणेश मंडळाच्या लढ्याला यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेल्या ‘मी शिवसेना बोलतेय’ या देखाव्याला दोन दुरुस्त्यांसह मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त विजय साळवी, शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे या सर्वांच्या कायदेशीर लढ्याला यश आले आहे. 31 ऑगस्टच्या मध्यरात्री विजय तरुण मित्र मंडळाच्या या देखाव्यावर आक्षेप घेत कल्याण पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांनी देखाव्याचे सगळे साहित्यही जप्त केले होते.

ADVERTISEMENT

सरकारी पक्षाचं कोणीही उपस्थित नसल्याने काल ही सुनावणी एका दिवसासाठी पुढे ढकलली होती. तसेच न्यायमूर्तींनी या प्रकरणात डीसीपी, वरिष्ठ पीआय आणि इतरांना सरकारी पक्षातर्फे उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयाने दोन दुरुस्त्यांसह या देखाव्याला पुन्हा परवानगी दिली आहे. या दुरुस्तीमध्ये exhibit C मधल्या पान. क्र 42/43 (ट्रान्सस्क्रिप्ट) मधल्या ॲाडिओमध्ये काही बदल करायचे आहेत.

पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी फडणवीसांचा नकार : पुन्हा चंद्रकांतदादांकडे जबाबदारी?

हे वाचलं का?

काय आहे कल्याणच्या देखाव्याचं प्रकरण?

कल्याण मधील विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली आहे. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता.

पुणे महापालिकेचे विभाजन : चंद्रकांतदादांची मागणी; फडणवीसांचा पूर्णविराम…

ADVERTISEMENT

कल्याण पोलिसांचा आक्षेप :

मात्र या देखाव्यावर आक्षेप घेत कल्याण पोलिसांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांनी देखाव्याचे सगळे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळाने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ADVERTISEMENT

विजय तरुण मित्र मंडळाकडून 59 वर्षांपासून साजरा केला जातो गणेशोत्सव :

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळ स्थापन होऊन 59 वर्षे झाली आहेत. 59 वर्षांपासून या मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी या मंडळाकडून ताज्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट हा ताजा विषय असल्याने या विषयावर देखावा साकारण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT