पोलीस कर्मचाऱ्याची मुलं मोस्ट वाँटेड आरोपी, हिंगोलीच्या चौकात लागले पोस्टर्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोणत्याही शहरात किंवा जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर असते. पण ज्यावेळी पोलीसच कायदा मोडतात तेव्हा सामान्यांचा या यंत्रणेवरचा विश्वास उडतो. हिंगोलीमध्येही सध्या असचं काहीसं चित्र पहायला मिळतं आहे. हिंगोली पोलिसांनी शहराच्या मुख्य चौकात मोस्ट वाँडेट आरोपींचं पोस्टर लावलं आहे. या चार आरोपींपैकी दोन आरोपी ही पोलीस कर्मचाऱ्याची मुलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सागर रुस्तुम काळे, विकी रुस्तुम काळे, करण राजपूत आणि अक्षय गिरी अशी या चार मोस्ट वाँटेड आरोपींची नावं आहेत. यातील सागर आणि विकी काळे हे दोन आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल रुस्तुम काळे यांची मुलं आहेत. ज्यामुळे हिंगोलीत सध्या चर्चांना उधाण आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. भर दिवसा लूटमार, खून, दरोड्याच्या घटनेने हिंगोली शहर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी सध्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या बेलवाडी शिवारातील तानाजी बांगर यांच्या शेतात शिवम सुरेश कुरील आणि त्याचे मित्र गेले होते. जुन्या वादातून आरोपी सागर काळे, विक्की काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी आणि करण राजपूत यांनी  शिवमवर तलवार, लोखंडी रॉडने, डोक्यावर, कपाळावर आणि पायावर घाव घालून शिवम कुरील याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत शिवमचा पायही मोडला गेला आहे.

हे वाचलं का?

पुण्यातील संतापजनक घटना! नराधम बापाचा १४ वर्षाच्या लेकीवर बलात्कार

आरोपींनी शिवमसोबत असलेला साक्षीदार तानाजी बांगरलाही बेदम मारहाण केली. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींपैकी अभय चव्हाण याला अटक केली असून उर्वरित चार आरोपी फरार आहेत. या पाचही जणांवर पोलिसांनी IPC च्या 307,143,147,148,149 ,326 ,324,447,504,506 आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हिंगोलीच्या मुख्य चौकात हे बॅनर लावण्यात आलं असून या गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीसही दिलं जाईल असं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

बीड : अंबाजोगाईत पोलिसांच्या घरात घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरीला

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT