गुप्तधनाचं आमिष दाखवून शेतकऱ्याला संपवलं, हिंगोलीतल्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

मुंबई तक

हिंगोलीच्या वाढोना शिवारात एका विहीरीत पोत्यात दगडासह आढळलेल्या एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. या व्यक्तीच्या हत्येमागंच गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शिवाजी काटकर असं या मयत शेतकऱ्याचं नाव असून गावातील जुन्या वादातून डुख धरुन आरोपीने गुप्तधनाचं आमिष दाखवत शिवाजी काटकर यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. मुख्य आरोपी रामदास झुंगरे याला पोलिसांनी या हत्येच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंगोलीच्या वाढोना शिवारात एका विहीरीत पोत्यात दगडासह आढळलेल्या एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. या व्यक्तीच्या हत्येमागंच गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शिवाजी काटकर असं या मयत शेतकऱ्याचं नाव असून गावातील जुन्या वादातून डुख धरुन आरोपीने गुप्तधनाचं आमिष दाखवत शिवाजी काटकर यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

मुख्य आरोपी रामदास झुंगरे याला पोलिसांनी या हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून या घटनेत सहभागी झालेल्या तीन इतर आरोपींचा शोध सुरु आहे. झुंगरे हे माजी उपसरपंच आहेत.

वाढोना शिवारात पान कण्हेरगाव येथे आरोपी रामदास झुंगरे आणि मयत शेतकरी शिवाजी काटकर हे रहायचे. माझ्याघराकडे एकटक पाहत असतो यावरुन एकदा झुंगरे आणि काटकर यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर झुंगरेच्या मनात काटकर यांच्याविषयी राग खदखदत होता. काटकर यांना गुप्तधनाची लालसा असल्याचं झुंगरे याला समजलं होतं. याचाच वापर करुन झुंगरेने शिवाजी काटकर यांना काटा काढायचं ठरवलं.

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला भावाचा विरोध, होणाऱ्या नवऱ्यासह बहिणीवरही चाकूने हल्ला

हे वाचलं का?

    follow whatsapp