केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नकोत, गृहमंत्र्यांचाही राजीनामा घ्या – चंद्रकांत पाटलांची मागणी
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणामध्ये वाझे यांचा सहभाग होता हे आता निष्पन्न झालंय. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक गंभीर झालेलं असून केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या घेऊन भागणार नाही, महाविकास आघाडी सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणामध्ये वाझे यांचा सहभाग होता हे आता निष्पन्न झालंय. त्यामुळे हे प्रकरण आता अधिक गंभीर झालेलं असून केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या घेऊन भागणार नाही, महाविकास आघाडी सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारने मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत हेमंत नगराळे यांना आयुक्तपदावर संधी दिली आहे.
दरम्यान या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना विरुद्ध भाजप हा राजकीय सामना चांगलाच रंगलेला दिसत आहे. नवीन बदलीनुसार परमबीर सिंग यांची होमगार्डमध्ये बदली करण्यात आली. कोल्हापुरात बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामाच केला.”राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्यामुळे जनता नाराज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अक्षरशः लिलाव पद्धतीने बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे या बदल्यांविषयी महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी. वाझे प्रकरणात केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन चालणार नाही तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेतला पाहिजे”, अशी मागणी पाटील यांनी केली.
भाजपने विधानसभेत सरकारवर दबाव आणल्यानंतर वाझेंची पहिल्यांदा बदली करण्यात आली. NIA ने तपास हाती घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वाझे यांना मोठं राजकीय संरक्षण आहे. यामुळेच त्यांना सातत्याने वाचवण्याचा आणि सांभाळून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून झाल्याचंही पाटील म्हणाले.
मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?