औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा
इसरार चिश्ती, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. ही ऑनर किलिंगची घटना प्रचंड भयंकर असल्याचं आता समोर आलं आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. या गोष्टीचा राग मनात धरुन मुलीच्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृण प्रकारे तिची हत्या केली. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणी […]
ADVERTISEMENT

इसरार चिश्ती, औरंगाबाद: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. ही ऑनर किलिंगची घटना प्रचंड भयंकर असल्याचं आता समोर आलं आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. या गोष्टीचा राग मनात धरुन मुलीच्या आईने आणि अल्पवयीन भावाने अत्यंत निर्घृण प्रकारे तिची हत्या केली.
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणी किर्तीचा पती अविनाश थोरे याने ‘मुंबई Tak’शी बोलताना त्या दिवशी नेमकी काय घटना घडली हे जसंच्या तसं सांगितलं आहे.
किर्तीची हत्या कशी झाली?, पतीने सांगितेला घटनाक्रम जसाच्या तसा:
‘त्या दिवशी माझी तब्येत खराब होती.. आम्ही दोघं ना वावरात कांदे खुरपत होतो. तर मी तिला म्हटलं की, मी घरी जातो माझी तब्येत काही बरी नाही. मी घरी जाऊन झोपतो.. तुला जोपर्यंत काम करायचंय तोपर्यंत कर.. नंतर घरी निघून ये. मग मी घरी येऊन झोपलो. थोड्या वेळाने मला घरात कुणीतरी आल्यासारखं वाटलं.’










