विल्सन यांचा कॉम्प्युटर हॅक करुन त्यात पेपर प्लाण्ट केले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: साधारण 22 महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी अक्टिव्हिस्ट रोना व्हिल्सन यांच्या दिल्ली येथील घरावर छापा मारुन त्यांना अटक केली होती. सायबर हल्लेखोरांनी रिमोट पद्धतीने त्यांच्या कम्प्यूटरचा अक्सेस मिळवून त्यामध्ये ‘अर्बन नक्सल’ प्रकरणात गोवणारी ती पत्र त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये प्लाण्ट केली. 2018 मध्ये माध्यमांमध्ये हेडलाईन बनलेल्या ‘अर्बन नक्सल केस’ मध्ये विल्सन यांचा हा कॉम्प्युटर हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. अर्बन नक्सल केस मध्ये तुरुंगात असलेले कवी वरवरा राव, अडव्होकेट सुधा भारद्वाज, अरुन फेरेरा आणि इतरांप्रमाणेच रोना विल्सन हे गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत.

विल्सन यांनी पुणे पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यासाठी अमेरिका स्थित आर्सेनल कंपनीची 17 एप्रिल 2018 पासून मदत घेतली. ही खासगी कंपनी डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रात सरकारी कंपन्या आणि लॉ फर्म्सना मदत करते.

याच आर्सेनल कंपनीला 31 जुलै 2020 मध्ये एक हार्ड ड्राईव्ह मिळालं ज्याची कॉम्प्युटरला जोडलेल्या थंब ड्राईव्हबरोबर तपासणी केली. त्यानंतर आर्सेनल या कंपनीने तयार केलेल्या रिपोर्टच्या 16 व्या पानावर कंपनीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, ज्यानुसार सायबर हल्लेखोराने विल्सन यांच्या कॉम्प्युटरमध्ये शिरकाव करुन कॉम्प्युटरवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि चुकीचे डॉक्युमेंट्स त्यात प्लाण्ट केल. हल्लेखोराचा हाच उद्देश होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सायबर हल्लेखोराने तब्बल 22 महिने विल्सन यांचा कॉम्प्युटर फक्त हॅक केला. त्यासाठी हल्लेखोराने वापरलेलं मालवेयर जसं विल्सन यांचा कॉम्प्युटर हॅक करायला तर वापरलं तसंच त्यांच्याबरोबर भीमा कोरेगाव केसमध्ये त्यांचे सह आरोपी यांचे कॉम्प्युटरवर हॅक करायला आणि भारतातील इतर हाय प्रोफाईल केसमध्येही वापरण्यात आलय.

ADVERTISEMENT

आर्सेनलच्या माहितीनुसार

ADVERTISEMENT

विल्सन यांच्या कॉम्प्युटरवर 13 जून 2016 वर पहिल्यांदा हल्ला झाला. वरवरा राव यांच्या ईमेल अकांटवरुन सायबर हल्लेखोराने एक संशयास्पद ईमेल विल्सन पाठवला होता. ज्यांना उत्तर देताना वरवरा राव यांच्या ईमेल अकाउंटवरुन विल्सन यांच्या कॉम्प्युटरवरील विशिष्ट डॉक्युमेंट्स उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधारण तीन तासांनंतर विल्सन यांच्या कॉम्प्युटरवर डॉक्युमेंट उघडल्याचा रिप्लाय गेला. हे डॉक्युमेंट उघडणं ही एक चेन होती. ज्यातून नेट व्हायर रिमोट च्या माध्यमातून विल्सन यांच्या कॉम्प्युटरला अक्सेस मिळवण्यात हल्लेखोर यशस्वी झाला होता. विल्सन यांना वाटत होतं की ते वरवरा राव यांच्याकडून आलेली एक लिंक उघडत आहेत पण प्रत्यक्षात मात्र ती लिंक त्यांचा कॉम्प्युटर एका चुकीच्या सर्व्हरशी जोडणारी होती.

जानेवारी 2020 मध्ये ही केस पुणे पोलिसांकडून नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपविण्यात आली.

या तपासात विल्सन यांच्या कॉम्प्युटरवर धक्कादायक कागदपत्र आढळली आहेत. त्यात 13 पत्र आढळली. ज्या पत्रांवरुन इतर आरोपी हे भारतात बंदी घातलल्या माओवादी संघटनांना मदत करत असल्याचं आणि पंतप्रधानांची हत्या करण्याचा कट रचत असल्याचं समोर येत होतं.

आर्सेनलच्या रिपोर्टनुसार विल्सन यांच्या कॉम्प्युटरवर 16 एप्रिल 2018 ला संध्याकाळी 4.50 ला शेवटचा बदल करण्यात आला. पुणे पोलिसांनी विल्सन यांच्य मुनिरका येथील घरावर रेड टाकण्याच्या 12 तास आधी हे बदल करण्यात आले होते.

पण आर्सेनलच्या रिपोर्टमध्ये हा सायबर हल्लेखोर कोण, कोणी हे चुकीचे डॉक्युमेंट्स विल्सन यांच्या लॅपटॉपवर टाकले याची थेट माहिती दिलेली नाही. आता हा रिपोर्ट विल्सन यांच्या लिगल टिमने फाईल केलेल्या पिटीशनचाच एक भाग आहे. जी केस लवकरच हायकोर्टासमोर येऊ घातली आहे.

भीमा कोरेगावमधील 15 आरोपींची ट्रायल अजूनही सुरू झालेली नाही. वेगवेगळ्या कोर्टात त्यांनी बेलसाठी केलेली याचिक फेटाळून लावण्यात आल्या आहेत. तसंच काही याचिकांवर कोर्टांमध्ये अद्याप सुनावणी सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT