आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरे असं का म्हणाले? दुबार मुस्लिम मतदारांवरुन राजकारण तापलं

मुंबई तक

Uddhav Thackeray on Ashish Shelar press conference , Mumbai : आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरे असं का म्हणाले? दुबार मुस्लिम मतदारांवरुन राजकारण तापलं

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Ashish Shelar press conference
Uddhav Thackeray on Ashish Shelar press conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

point

मुस्लिम दुबार मतदारांवरुन राजकारण तापलं

Uddhav Thackeray on Ashish Shelar press conference , Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील कथित गैरव्यवहार आणि मतचोरीच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्द्यावर नुकताच मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चादरम्यान राज ठाकरे यांनी मतदार याद्यांतील दुबार नावे हटवण्यासाठी थेट “खळखट्याक” करण्याचे आवाहन केले. दरम्यान, आता राज ठाकरे आणि महाविकास आघाडीला भाजप नेते आशिष शेलार ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान,आशिष शेलार यांनी दुबार मतदार दाखवल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

दुबार मतदारांचा मुद्दा मांडताना शेलार यांनी आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले, “आम्ही 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 इतकी आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यावर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 वर जाईल.” ही फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असून, महाविकास आघाडीच्या समर्थकांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक असू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

आशिष शेलार यांच्याकडून दुबार मतदारांचा आरोप; कोणत्या मतदारसंघात किती?

कर्जत-जामखेड : रोहित पवार — 5532 दुबार मुस्लिम मते

साकोली : नाना पटोले — 477 दुबार मुस्लिम मते

हे वाचलं का?

    follow whatsapp