छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला गेली कशी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत. त्यांची भवानी तलवार ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या जगदंबा तलवारीचाही शोध लागला आहे. ही तलवार लंडनमध्ये आहे. ही तलवार २०२४ च्या आधी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीची चर्चा सुरू झाली आहे. आपण जाणून घेणार आहोत.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांची एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांची एक तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचं संवर्धन करण्याचं काम संभाजीराजे छत्रपती आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या मंदिरात ही तलवार जतन करून ठेवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

२०२१ मध्ये काय जगदंबा तलवारीबाबत काय माहिती समोर आली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार ही इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयातील रॉयल कलेक्शनमध्ये ठेवण्यात आल्याचे ठोस पुरावे सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले. ही माहिती सह्याद्री इतिहास संशोधन समिती केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी दिली होती. यावेळी आडसुळे यांनी ही माहिती दिली होती की चौथे शिवाजी महाराज यांनी १८७५ मध्ये भारत भेटीवर आलेल्या ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्सला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार होती. इंद्रजित सावंत यांनी पुस्तकातही ही बाब मांडली आहे. मात्र कॅटलॉगमुळे ही तलवार राणी वैयक्तिक संग्रहालयात असल्याचं सिद्ध झालं.

इंद्रजित सावंत यांनी या जगदंबा तलवारीबाबत काय म्हटलं आहे?

प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड हा १८७५ मध्ये भारत भेटीवर आला होता. या प्रिन्सला जुनी शस्त्रं गोळा करण्याची आवड होती. त्यातून त्याने भारतातल्या राजे-महाराजांकडून अनेक शस्त्रं नेली. या शस्त्रांमध्ये कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हे अवघ्या ११ वर्षांचे होते. त्यांच्याकडून ही जगदंबा तलवार जबरदस्तीचं गिफ्ट म्हणून घेऊन गेला. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली आहे.

ADVERTISEMENT

हर्षल सुर्वे यांनी त्यावेळी काय भूमिका मांडली होती?

शिवरायांची तलवार ही आमच्याकडे नाही असं वारंवार इंग्लंडच्या म्युझियमकडून सांगण्यात येत होतं. मात्र जो कॅटलॉग समोर आला त्यामुळे रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा खोटेपणा उघड झाला. असं हर्षल सुर्वेंनी त्यावेळी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

कॅटलॉगमधल्या तलवारीचं वर्णन काय करण्यात आलं आहे?

जुनी युरोपियन एकपाती सरळ तलवार या तलवारीच्या दोन्ही बाजूला खोबणी आहे.

तलवारीजवळच्या मुठीजवळच्या गजावर सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरण्यात आली आहे.

या तलावरीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे तर शेवटचं टोक हे अणकुचीदार आहे त्यावर भरीव फुलांची नक्षी आणि हिरे तसंच माणिक जडवण्यात आले आहेत

सदर तलवार ही कोल्हापूरच्या माननीय छत्रपतींनी दिली आहे ती मराठ्यांचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे ही तलवार त्यांच्या वापरातील तलवार होती

कॅटलॉगमधला इंग्रजीतला उल्लेख

Sabre – ” Mahratta ” straight, one-edged old European blade, with two grooves on each side, in one of which ” I. H. S. ” is stamped three times ; the raised steel supports at the hilt are damascened with gold in floral designs ; the guarded hilt is of iron with a broad knuckle-guard and a circular pommel, terminating in a spike and encrusted with heavy open-work floral decoration of gold, thickly set with large diamonds and rubies. Presented by H. H. the Maharaja of Kolapore as a relic of the Mahratta chief Sivaji, to whom it formerly belonged.

या तलवारीची वैशिष्ट्यं काय आहेत?

तलवारीची लांबी १२१ सेंटिमीटर आहे म्हणजेच ही तलवार जवळपास ४ फूट आहे

तलवारीच्या रत्नजडित मुठीवर संपूर्ण सोन्याचं काम आहे

तलवार दिसायला अत्यंत सुंदर असून वजनाने कमी आहे

बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळातही जगदंबा तलवार आणण्याचा प्रय़त्न

महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळातही ही तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न झाला होता. ही तलवार त्यांना भारतात आणायची होती. मात्र यावरून खूप राजकारण झालं त्यामुळे त्यांना त्यांचे प्रयत्न सोडावे लागले. १९८० मध्ये ए. आर. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात तलवार भारतात आणली जावी यासाठी आंदोलन उभं राहिलं होतं. ए. आर. अंतुले हे स्वतः वकील असल्याने त्यांनी पुराव्यांच्या आधारावर जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

त्यावेळी अंतुले यांनी ब्रिटनच्या महाराणीसोबत तलवार भारतात आणण्यासाठी चर्चा करायचं ठरवलं होतं. ही भेट होण्याआधीच अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जाले. मात्र ब्रिटनच्या राणीसोबत ठरलेल्या बैठकीसाठी ते गेलेच नाहीत असं सांगण्यात येतं. त्यामुळे त्यावेळी ही तलवार भारतात येऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात आणावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT