Taliye ची दुर्घटना कशी घडली? सगळं गावच डोंगराखाली कसं गाडलं गेलं?

मुंबई तक

तळीये गाव मागच्या गुरूवारपर्यंत चांगलं हसत खेळत होतं. मात्र आता ते गाव होत्याचं नव्हतं झालं आहे. पाच दिवस या ठिकाणी सुरू असलेलं मदत आणि बचावकार्य आता थांबवण्यात आलं आहे. हे सगळं गाव गाडलं गेलं. 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अवघे पाच लोक वाचले आहेत. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे डोंगराचा भाग खाली आला आणि त्याखाली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

तळीये गाव मागच्या गुरूवारपर्यंत चांगलं हसत खेळत होतं. मात्र आता ते गाव होत्याचं नव्हतं झालं आहे. पाच दिवस या ठिकाणी सुरू असलेलं मदत आणि बचावकार्य आता थांबवण्यात आलं आहे. हे सगळं गाव गाडलं गेलं. 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अवघे पाच लोक वाचले आहेत. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे डोंगराचा भाग खाली आला आणि त्याखाली सगळं गावच गाडलं गेलं आहे. अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे. या ठिकाणी आजच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या गावाला भेट दिली. या गावाचं असं का झालं? नेमकी ती घटना काय घडली? जाणून घेतलं आहे मुंबई तकने.

काय घडलं ?

22 जुलैला दुपारी 12 वाजता पहिल्यांदा डोंगराचा काही भाग खाली आला. डोंगर खचला म्हणून गावातले काही हौशी तरुण जमले आणि त्यांनी त्यासंदर्भातले व्हीडिओही मोबाईलमध्ये चित्रित केले. हा आपल्या मोबाईलमधला शेवटचा व्हीडिओ असेल याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती. या गावातले काही शेलार आणि सणस कुटुंबीय घाबरले आणि त्यांची कुटुंबं त्यांनी तळीयेच्या खालच्या गावात बारसवाडी पठार या गावात हलवली.