धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? आजही न सुटलेलं कोडं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धर्मवीर हे बिरूद ज्या नेत्याच्या नावापुढे लागलं तो एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २००१ ला झाला. त्यांच्या मृत्यूला २१ वर्षे होऊन गेली आहेत तरीही त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की तो घातपात होता हे कोडं अद्यापही कायम आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना वाढवण्यात आणि मोठी करण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा

ठाणे जिल्हा प्रमुख या पदावर असलेले आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली, मोठी केली. खेडेगावांपर्यंत शिवसेना नेली. शिवसेना गावागावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये वाढवण्याचं श्रेय जातं ते त्यांनाच. आनंद दिघे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इतकंच नाही तर आनंद दिघे हे ठाणेकरांसाठी देवच झाले होते. ठाण्यातल्या टेंभी नाका भागात त्यांचं प्रति न्यायालय भरत असे. त्यांचे किस्से आजही ठाण्यात सांगितले जातात.

हे वाचलं का?

बाळासाहेब ठाकरेंच्या एकदम जवळचे होते आनंद दिघे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आनंद दिघे होते. बाळासाहेब ठाकरे हे कायमच आनंद दिघे यांचं कौतुक करायचे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं शिवसेना हा पक्ष ठाणे जिल्ह्यात मोठा करण्याचं श्रेय जातं ते आनंद दिघे यांनाच. बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहात असत. मग ते नवरात्र उत्सव असो किंवा इतर कुठलाही पक्षाचा कार्यक्रम. आनंद दिघे हे त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता.

ADVERTISEMENT

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आला सिनेमा

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला एक सिनेमा मे महिन्यात आपल्या भेटीला आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. या सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. हा सिनेमाच पुढे होणाऱ्या राजकीय भूकंपाची नांदीही ठरला. १३ मे २०२२ ला हा सिनेमा आला होता. त्यानंतर जून महिन्यात राज्यात राजकीय भूकंप झाला. आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं. त्यापुढे काय घडलं ते महाराष्ट्राला माहित आहेच.

ADVERTISEMENT

धर्मवीर या सिनेमाच्या वेळीही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली. त्यांचा मृत्यू अपघात होता की घातपात हे कोडं आजही उलगडलेलं नाही. धर्मवीर या सिनेमाचा शेवटही हेच वास्तव सांगून जाणारा होता. एक पत्रकार आनंद दिघे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

‘गद्दारांना माफी नाही!’, असं का म्हणाले होते आनंद दिघे?; ठाण्यात काय घडलं होतं?

आनंद दिघेंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच काय वक्तव्य केलं आहे?

आम्ही दोघंही धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित असलेल्या सिनेमांत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत आम्ही कामही केलं आहे. दिघेसाहेबांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळात पोहचवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून त्या माणसाने शिवसेना वाढवली. शहरी भाग, आदिवासी वस्त्या, पाडे या ठिकाणी शिवसेना पोहचवली.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“आनंद दिघेंनी वयाची ५० वर्षेही पूर्ण केली नव्हती तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्या आयुष्यातलीही दुःखद घटना आहे. एका दिवसात दोन दिवसाचं काम करणारे आनंद दिघे होते. याचा साक्षीदार मी तर आहेच पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत. शिवसेना आणि ठाणे म्हटलं की आनंद दिघे यांचं काम समोर यायचं. बाळासाहेब ठाकरेंनाही हेवा वाटावा असं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं.”

मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन.ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही.” असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जुलैला केलं आहे.

आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला?

आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली होती. ते म्हणाले होते की आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू असतात. गणपतीचे दिवस होते. त्या दिवसात त्यांचा १९ ऑगस्टला अपघात झाला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेलं असता तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आहे. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली असंही शिंदे यांनी सांगितलं होतं. असं सगळं असलं तरीही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा घडतातच. खासकरून तो अपघात होता की घातपात ही चर्चा आजही रंगताना दिसते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT