कोकण रेल्वे कोकणात कशी आली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकणातल पूर्वी जायचं, तर रस्ताशिवाय दुसरा कोणताच पर्य़ाय नव्हता, महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून कोकण किनारपट्टीवर पोचण्यासाठी फक्त पश्चिम घाटातल्या घाटरस्तांचा पर्याय होता.

ADVERTISEMENT

1993 पर्यंत कोकणात रेल्वेचीसुध्दा सोय नव्हती. तेव्हा कोकणवासींयांचा आयुष्य सुकर करणारी कोकण रेल्वे कोकणात पोचली कशी याची जन्मकथा

1966 साली दिवा ते पनवेलपर्यंत लोहमार्ग होता.

हे वाचलं का?

1984 मध्ये रेल्वे कडून सुरतकल ते मडगाव पर्यंतच्या मार्गाचा सर्व्हे करण्यात आला होता. 1985 पर्यंत मडगाव ते रोहा या मार्गाचा सर्व्हे करण्यात आला. दक्षिण रेल्वेने हा सर्व्हे 1988 मध्ये पुर्ण केला आणि या प्रोजेक्टला कोकण रेल्वे असे नाव देण्यात आले. 1989 मध्ये हा प्रकल्प सुरु झाला आणि या प्रकल्पाचे प्रमुख नेमण्यात आले वरिष्ठ रेल्वे अधिकारी डॉ. ई. श्रीधरन. यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची 1990 ला स्थापना कऱण्यात आली.

कोकण रेल्वेसमोरची आव्हाने

ADVERTISEMENT

कोकण रेल्वे हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत अवघड असा प्रकल्प होता. सह्याद्रीच्या डोंगररांगा फोडून खडकाळ भागात रेल्वे ट्रँक टाकणे हे खरे आव्हान होते. ताशी 160 वेगाने रेल्वे धावण्यासाठी या मार्गावर पूल बांधणे, बोगदे खणणे हे आव्हानात्मक काम होते. कोकणातला तुफान पाऊस, सतत कोसळणाऱ्या दरडी, नदीला येणारे पूर या साऱ्या आव्हानांवर मात करत फक्त 8 वर्षांच्या विक्रमी वेळेते हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला. हे काम सुरु असताना झालेल्या अपघातात 10 लोकंही ठार झाले होते पण काम थांबले नाही.

ADVERTISEMENT

कोकण रेल्वे पुर्ण झाल्यानंतर या मार्गावर काही अफाट प्रकल्पांची निर्मीती झाली. 6 किलोमीटरचा भारतातला सर्वांत लांब कारबुडेचा बोगदा असेल किंवा आशिया खंडातला सर्वांत उंच पानवेलचा रेल्वे पुल.. कोकण रेल्वे चा भगीरथ प्रकल्प रेकॉर्ड टाईम वेळेत पुर्ण करण्यात आला आणि भारतातला एक महत्वाचा रेल्वेमार्ग खुला झाला.

कोकण रेल्वेची निर्मीती झाल्यानंतर डोंगराळ भागात काम करण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना काश्मीरमधल्या रेल्वेमार्गाचेही काम सोपवण्यात आले आणि त्यांनी ते ही यशस्वीरित्या पुर्ण केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT