‘किती पापं कराल अन् कुठे फेडाल?’, निर्भया वाहनांवरुन चित्रा वाघ ठाकरेंवर संतापल्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chitra Wagh Angry Nirbhaya Team Vehicles issue: मुंबई: ‘उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेली निर्भया पथके (Nirbhaya Team) शिंदे सरकार आल्यापासून गायब आहेत. सध्या महिला सुरक्षा वाऱ्यावर असून पथकातील गाड्या (Vehicles) आणि कर्मचारी-अधिकारी शिंदे गटाच्या फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.’ असे गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून करण्यात आला होता. ज्याला भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर देत तत्कालीन ठाकरे सरकारवरच आरोप केले आहेत. (how many more sins will you commit and where will you pay chitra wagh was angry at Mva for the nirbhaya team vehicles issue)

ADVERTISEMENT

पाहा चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या:

‘केंद्र सरकारकडून मिळालेल्या निर्भया निधीतून 220 वाहने खरेदी करायची. त्यातील 121 वाहने पोलिस ठाण्यांना द्यायची आणि 99 वाहने स्वत:च इतर विभागांना वाटायची. म्हणजे निर्भया पथकाची वाहने इतर विभागांना महाविकास आघाडी सरकारनेच दिलेली असताना आताच्या सरकारच्या नावाने बोंबा मारायच्या. अशी आणखी किती पापं करणार आणि ती कुठे फेडणार?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

हे वाचलं का?

गेल्या दोन दिवसांपासून निर्भया पथकाची वाहने शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘महाविकास आघाडी सरकारच्याच काळात 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्भया निधीतून 220 वाहने खरेदी करण्यात आली. या 220 वाहनांपैकी 121 वाहने मुंबईतील एकूण 94 पोलिस ठाण्यांना देण्यात आली, तर 99 वाहने ही इतर विभागांना वितरित करण्यात आली.’

Manisha Kayande : मुली, महिला असुरक्षित अन् निर्भया पथकं फुटीर आमदारांच्या दिमतीला?

ADVERTISEMENT

‘हे वितरण 19 मे 2022 रोजी करण्यात आले. सर्वांत आश्चर्य म्हणजे 9 मंत्र्यांच्या दावणीत ही निर्भया निधीची वाहने देण्यात आली. तर 12 वाहने व्हीव्हीआयपी ताफ्यासाठी देण्यात आली. यात मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, सुनील तटकरे, सुभाष देसाई इत्यादींचा समावेश होता. खा. सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यांसाठी सुद्धा याच निर्भया निधीतून घेण्यात आलेली वाहने वापरण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निर्भया निधीतील वाहन वापरायचे आणि इकडे मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका करायची, हा दुटप्पीपणा कशाला?’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवरच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

‘वस्तुत: निर्भया निधीतून खरेदी करण्यात आली असताना ती पोलिस विभागाने जलद प्रतिसाद पथक, श्वान पथक, संरक्षण शाखा, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत विभाग, मोटर परिवहन विभाग इत्यादी विभागांना करण्यात आले. हीच वाहने वाहतूक विभाग वरळीला 17 वाहने देण्यात आली. आदित्य ठाकरेंच्या वरळीवर विशेष लक्ष दिले गेले, हे ठीक. पण, निर्भया पथकाची वाहने आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात देताना तत्कालिन गृहविभागाला लाज वाटली नाही का?’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी एक प्रकारे आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

संजय राठोडांचा ‘तो’ इशारा, चित्रा वाघ म्हणाल्या “कुणाच्या बापाला घाबरत नाही”

‘आता आमचे सरकार आहे, तर ही सर्व वाहने पुन्हा निर्भया पथकासाठी देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. ती येत्या आठवडाभरात पूर्ण होईल.’ असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता चित्रा वाघ यांच्या स्पष्टीकरणानंतर ठाकरे गट त्यांना कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT