परपुरूषांनी पाहू नये म्हणून पत्नीचं केलं टक्कल, सोलापूरमधली धक्कादायक घटना

मुंबई तक

विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क न्हावी बोलावून २० वर्षीय पत्नी ‘सुमय्या’ हिचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ‘सुमय्या’ ही जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली,त्यावेळी उघडकीस आली.हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही ऐकून थक्क झाले. पीडित ‘सुमय्या’ हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विजयकुमार बाबर, प्रतिनिधी, सोलापूर

परपुरुषाने आपल्या पत्नीकडे पाहू नये यासाठी पतीने चक्क न्हावी बोलावून २० वर्षीय पत्नी ‘सुमय्या’ हिचे टक्कल केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ‘सुमय्या’ ही जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली,त्यावेळी उघडकीस आली.हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही ऐकून थक्क झाले.

पीडित ‘सुमय्या’ हिचा विवाह जोडबसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी मे महिन्यात झाला होता.लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने पीडित ‘सुमय्या’वर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळी हार बनवण्याचा व्यवसाय करत असून सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता.यातूनच पीडित ‘सुमय्या’च्या पतीने संशय घेत, तिला तुझे केस मला आवडत नाहीत,असे म्हणत सुमय्या हिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले.हे ऐकताच ‘सुमय्या’ने साफ नकार दिला; पण त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी न बोलणे,जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली.

यामुळे पीडितीने मनावर दगड ठेवून केस कापण्यास होकार दिला.केस कापण्यासाठी आल्यानंतरही त्यावेळी अगोदर विरोध केला नंतर ती नाईलाजाने शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आईवडिलांनी दिलीय. दरम्यान,पीडितेच्या पतीने बाहेरून नाभिकाला बोलावून पत्नीचे केस पूर्णतः काढून टाकले. हा प्रकार पीडितेने आपल्या माहेरी सांगितला नाही. काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडित सुमय्याला घरी नेऊन सोडले.

पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली. यानंतर तरीही पीडितेच्या आई-वडिलांनी मुलीला सासरी नांदविण्यासाठी घेऊन जातील असे वाटून याची तक्रार केली नाही; पण २२ दिवसानंतरही ‘सुमय्या च्या पतीने पीडितेच्या कुटुंबीयांचे फोन घेणे टाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जेलरोड पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी पीडित सुमय्याची विचारपूस केली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पीडिता जेव्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली होती तिच्या डोक्यावर थोडे केस आलेले दिसून येत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp