मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला दिली जात आहे – माजी गृहमंत्री अनिल देशमुख
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचा सामना करत असलेल्या अनिल देशमुखांविरोधात आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला दिली जात असल्याची प्रतिक्रीया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओ मेसेजद्वारे दिली आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नही असं म्हणत देशमुख यांनी आपण ईडीलाही […]
ADVERTISEMENT

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचा सामना करत असलेल्या अनिल देशमुखांविरोधात आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला दिली जात असल्याची प्रतिक्रीया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका व्हिडीओ मेसेजद्वारे दिली आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नही असं म्हणत देशमुख यांनी आपण ईडीलाही सहकार्य करणार असल्याचं सांगितलं.
“मला मिडीयाच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे.”
पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा अनेक योग्य निर्णय मी घेतले. यात प्रामुख्याने, आतापर्यंत सीबीआयला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरचा तपास करायचा असेल तर राज्य सराकारच्या परवागीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबर २०२० ला गृहविभागाने निर्णय घेतला की, सीबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असेल. महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्या नंतर देशातील अनेक राज्याने महाराष्ट्र सरकार प्रमाणेच निर्णय घेतला असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास होण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशानात केली होती. त्यावरुन मी एसआयटी गठीत करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन योग्य तपास सुरु केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असु शकते. त्यामुळेच सीबीआय आणि ईडीच्या मार्फत माझी चौकशी सुरु आहे. ज्या पध्दतीने मी सीबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पध्दतीने ईडीला सुध्दा सहकार्य करणार असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.