मराठा आरक्षणासाठी मी उद्याही राजीनामा देण्यास तयार: खा. संभाजीराजे
सोलापूर: ‘राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी उद्याच खासदारकीचा राजीनामा देईन.’ असं परखड मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले असून त्यानिमित्तानं सोलापुरात […]
ADVERTISEMENT

सोलापूर: ‘राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी उद्याच खासदारकीचा राजीनामा देईन.’ असं परखड मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलं आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले असून त्यानिमित्तानं सोलापुरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्याने जर आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर उद्याच राजीनामा देण्यासाठी तयार आहेत.
27 तारखेपर्यंत मराठा समाजाने संयम बाळगावा, संभाजीराजे छत्रपती आवाहन
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण स्वीकारले नाही. मराठा आरक्षणाबाबत मार्ग कसा काढायचा यासाठी आजचा दौरा आहे. ज्यांनी समाजाला वेळ दिला, त्याग केला त्यांना भेटण्यासाठी हा दौरा असल्याचे मत खा. संभाजीराजे यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केले.