बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब
मुंबई: ‘मी बाळासाहेब आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझेने माझ्यावर केलेले आरोप हे धादांत खोटे आहे. सरकारची बदनामी करण्यासाठीच असे आरोप केले जात आहे.’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे. ‘मागील […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मी बाळासाहेब आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझेने माझ्यावर केलेले आरोप हे धादांत खोटे आहे. सरकारची बदनामी करण्यासाठीच असे आरोप केले जात आहे.’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे.
‘मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपचे नेते सांगत आहेत की, तिसरी विकेट पडणार. याचाच अर्थ गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून हे कारस्थान शिजवलं जात आहे. सचिन वाझे सध्या NIA च्या ताब्यात आहे. अशावेळी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन भाजप राज्यातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. एवढंच काय तर माझी नार्को टेस्ट केली तर मी त्याच्यासाठी देखील तयार आहे.’ असं म्हणत अनिल परब यांनी या संपूर्णं प्रकरणात आता भाजपवर निशाणा साधला आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले अनिल परब:
‘बाळासाहेब आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो…’
‘आज सचिन वाझे यांनी एनआयएला कोर्टात पत्र दिलं. या पत्रात उल्लेख केला आहे की, मी सचिन वाझेंना बोलावलं होतं आणि त्यावेळी मी SBUT च्या ट्रस्टींना 50 कोटी रुपये घेऊन बोलावलं होतं. तर दुसरा आरोप असा आहे की, जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदारांकडून 2-2 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत. मी बाळासाहेबांची आणि माझ्या दोन मुली आहेत ज्या मला अत्यंत प्रिय आहेत त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, हे आरोप धादांत खोटे आहेत.’ असं म्हणत अनिल परबांनी सर्व आरोप नाकारले आहेत.