IAS Govind Jaiswal : वडील रिक्षा चालवायचे, मुलगा झाला IAS, आता झळकणार मोठ्या पडद्यावर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द मनात असेल तर कोणत्याही परिस्थितीत ती मिळवता येते. असचं IAS गोविंद जयस्वाल यांनी मेहनत करत आपलं स्वपने पूर्ण केलं.

हे वाचलं का?

बिहारचे रहिवासी असलेले गोविंद जयस्वाल यांनी 2006 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस बनले.

ADVERTISEMENT

गोविंद जयस्वाल यांच्या मेहनतीला आणि कार्याला आज जग सलाम करतं. आयएएस होऊन यशाचं शिखर गाठणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.

ADVERTISEMENT

गोविंद जयस्वाल यांचे वडील रिक्षाचालक होते, त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून आपल्या मुलाला शिकवलं आणि त्याला आयएएस बनवलं.

गोविंद जयस्वाल यांच्या संघर्षाची कहाणी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

त्यांच्या खऱ्या आयुष्यावर एक चित्रपट बनत आहे, ज्याचं नाव ‘अब दिल्ली दूर नहीं है’ असं आहे. हा चित्रपट यावर्षी १२ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

लहानपणीच गोविंदा जयस्वाल यांच्या आईचं निधन झालं. गरिबीत जगत असूनही आपल्या वैयक्तिक समस्या कधीच स्वप्नांपुढे येऊ दिल्या नाहीत.

या चित्रपटाचा मुख्य अभिनेता इमरान जाहिद आहे, जो पडद्यावर IAS गोविंद जैस्वाल यांची भूमिका साकारताना दिसत आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT