तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, पुढच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याचे आदेश
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण, तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदावर तुकाराम मुंढे कार्यरत होते. त्यांच्याकडून या पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तसंच प्रकल्प संचालक, महरााष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यात […]
ADVERTISEMENT
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण, तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदावर तुकाराम मुंढे कार्यरत होते. त्यांच्याकडून या पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तसंच प्रकल्प संचालक, महरााष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यात यावी असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
डॅशिंग अधिकारी अशी तुकाराम मुंढेंची ओळख
महाविकास आघाडीच्या काळात अडगळीत पडलेले डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे हे शिंदे-फडणवीस सरकार येताच ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळाले होते. तुकाराम मुंढे यांनी काही आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला होता मात्र या पदावरून त्यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे अतिशय शिस्तबद्ध आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ज्या विभागात तुकाराम मुंढे जातात त्या विभागात ते आपल्या शिस्तीने कामावर छाप पडतात, अशी त्यांची ओळख आहे. नवीन कार्यभार सांभाळताच तुकाराम मुंढे यांच्या याच प्रतिमेचा पुन्हा प्रत्यय आला होता. आता त्यांना कुठल्या विभागात बदलीनंतर पाठवलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कडक शिस्तीचे आयएस अधिकारी म्हणून लौकिक
तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. आपल्या काटेकोर स्वभावामुळे आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसंच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असतं. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी फार हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे.
हे वाचलं का?
तुकाराम मुंढे जिथे जातील तिथल्या प्रशासनाला धडकी भरते. वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने त्यांच्या बातम्यांनी भरून निघतात. मग याच सगळ्या गोंधळात त्यांची बदली होते. लोक आंदोलनं करतात. पुन्हा त्याची बातमी. पुन्हा नवीन ठिकाणी गेलं की पहिले पाढे पंचावन्न. मुंढेच्या कारकिर्दीचा आता तो अविभाज्य घटक झाला आहे.
नाशिक, नवी मुंबई आणि नागपूर महापालिका या तीन मोठ्या महापालिकांचं आयुक्तपद त्यांनी भूषवलं. नगरसेवकांशी आणि महापौरांशी भांडणं, नगरसेवकांना वाईट वागणूक, सत्ताधाऱ्यांशी कायम वाद, शिस्तीचे भोक्ते असल्यामुळे जिथे जातील तिथे आधी वेळेवर उपस्थितीची सक्ती करणे, दणादण निलंबनाची कारवाई करणं ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्यं आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना नेमकं कुठलं पद दिलं जाणार हे पुढील आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT