सरपंच नसलेलं गाव, पाहा काय आहे ‘या’ गावाची कहाणी

मुंबई तक

धुळे: धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड देखील झाली आहे. तर १८ फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. असंच चित्र काही सिंदखेडा तालुक्यातील महाळपूर गावी दिसून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

धुळे: धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सध्या सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड देखील झाली आहे. तर १८ फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. असंच चित्र काही सिंदखेडा तालुक्यातील महाळपूर गावी दिसून आले आहे.

महाळपूर ग्रामपंचायतीसाठी सात सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात चार महिला व तीन पुरुष निवडून आले. येथे सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले. मात्र येथे एकाही महिलेने सरपंच पदासाठी दावा दाखल केला नव्हता. यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखाने उपसरपंचपदी विराजमान झालेल्या जितेंद्र सुभाष पाटील यांना सर्व अधिकार दिले आहेत.

महाराष्ट्रात प्रथमच अशी घटना घडली असून सर्वत्र याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या गावाची लोकसंख्या जवळजवल 1250 असून सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदाने याठिकाणी नांदत आहेत. तंटामुक्त गाव अशी देखील महाळपूरची ओळख आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ एकोप्याने राहत असून एकमुखाने सर्व सदस्यांनी महाळपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विराजमान झालेल्या जितेंद्र सुभाष पाटील यांची निवड करून त्यांनाच सर्व अधिकार बहाल केले आहेत.

ही बातमी देखील पाहा: पतीला खांद्यावर उचलून घेणाऱ्या बायकोचं पोस्ट विभागाकडून कौतुक

हे वाचलं का?

    follow whatsapp