महाराष्ट्रात दिवसभरात 3700 हून नव्या रूग्णांचं निदान, 56 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 3783 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 56 कोरोना बाधित रूग्णांची मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाले आहे. आज राज्यात 4364 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 17 हजार 70 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.7 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 63 लाख 61 हजार 89 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 7 हजार 930 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 87 हजार 356 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1926 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 34 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 514 नवे रूग्ण

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईत 514 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 604 रूग्णांना आज दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. तर मुंबईत सध्याच्या घडीला 4602 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1277 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा ग्रोथ रेट 8 ते 14 सप्टेंबर या कालावधीत 0.06 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

मुंबई-5488

ADVERTISEMENT

ठाणे-7249

रत्नागिरी-1129

पुणे-13258

सातारा-4302

सांगली-2105

कोल्हापूर-1202

सोलापूर-2725

अहमदनगर-6586

महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रूग्णांची संख्या जास्त आहे हे आकडेवारी दाखवते आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT