महाराष्ट्रात दुसऱ्यांदा Corona रूग्णसंख्येचा निचांक, दिवसभरात 2432 रूग्णांचे निदान
महाराष्ट्रात दिवसभरात पुन्हा एकदा कोरोना रूग्णसंख्येचा निचांक पाहण्यास मिळाला आहे. दिवसभरात 2432 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 2895 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 62 हजार 248 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.26 इतका झाला आहे. राज्यात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात पुन्हा एकदा कोरोना रूग्णसंख्येचा निचांक पाहण्यास मिळाला आहे. दिवसभरात 2432 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 2895 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 62 हजार 248 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.26 इतका झाला आहे.
राज्यात दिवसभरात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 82 लाख 86 हजार 36 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 41 हजार 762 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 57 हजार 144 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1517 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्याचा मृत्यू दर सध्याच्या घडीला 2.12 टक्के इतका झाला आहे.
राज्यात आज घडीला 37 हजार 43 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2432 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 41 हजार 762 इतकी झाली आहे.