महाराष्ट्रात ‘या’ 6 मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारला संप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Doctors Strike: मुंबई: महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर (Resident Doctors Strike In Maharashtra) संपावर आहेत. आपल्या अनेक मागण्यांसाठी डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून निदर्शने करत होते, मात्र अखेर त्यांना संपावर जावे लागले आहे. राज्यातील जवळजवळ 5 हजारांच्या आसपास डॉक्टर्स या संपात सहभागी आहेत. हा संप पुकारण्यामागील कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारला शनिवारपर्यंतचा वेळ दिला होता. या मागण्या मान्य केल्या नाहीत यामुळे संप पुकारण्यात आला. सरकारकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने डॉक्टरांनी हे पाऊल उचललेले आहे. (Doctors Strike In Maharashtra)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात डॉक्टरांनी ‘या’ ६ मागण्यांसाठी पुकारला संप… जाणून घ्या

ज्येष्ठ निवासी पदावर नवीन जागा निर्माण कराव्यात, डॉक्टरांचा डीए 17 व्या वेतन आयोगाच्या आधारे असावा, सरकारने कोरोना सेवा थकबाकी देण्याचे आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नाही, ते पूर्ण करावे, अशी डॉक्टरांची सरकारला मागणी आहे. आपल्या मागण्यांबाबत डॉक्टर रुग्णालयाबाहेर निदर्शने करत असून आज महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टर संपावर आहेत.

शहाजीबापू पाटलांचा फिटनेस फंडा; साठीत केला डाएट फॉलो… कमी केलं तब्बल ९ किलो वजन

हे वाचलं का?

संप पुकारला तरी, आपत्कालीन सेवा सुरू राहाणार… डॉक्टरांचा इशारा!

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या अनेक मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाही आहेत. त्यांनी महाराष्ट्रात संप पुकारला असला तरी, आपत्कालीन सेवा सुरू राहतील असे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, ज्यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे त्यांनी, 2 जानेवारीपासून आपत्कालीन नसलेल्या सर्व सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली होती. या संपाला महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड रेसिडेंट डॉक्टर्सनेही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मकतेने विचार करत आहे. काही विषयांबाबत केंद्राशीदेखील बोलणी सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT