पंढरपूर: घर पेटवून देणारे चोरटे.. चोरीही केली अन् घराला आगही लावली!
नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूर शहरामध्ये चोरट्यांनी चोरी करून घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील सर्व लोक परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच जाताना चोरट्यांनी घराला आगही लावून दिल्याचं विचित्र प्रकार समोर आला आहे. यामुळे घरातील सुमारे दीड […]
ADVERTISEMENT

नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूर शहरामध्ये चोरट्यांनी चोरी करून घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील सर्व लोक परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच जाताना चोरट्यांनी घराला आगही लावून दिल्याचं विचित्र प्रकार समोर आला आहे. यामुळे घरातील सुमारे दीड लाखांचे साहित्य जळून खाक झालं आहे.
पंढरपूर शहरानजीक इसबावी येथे पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अरुण जनार्दन घोडके यांचे इसबावी हद्दीत राहते घर आहे. घोडके कुटुंबीय घराला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. पण बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे दिसून आले.
गुरुवारी पहाटेपर्यंत ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दरम्यान दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील रोख 10 हजार रुपये तसेच अडीच तोळे सोन्याचे लॉकेट, अर्धा तोळे सोन्याचे कानातील टॉप्स असे एकूण 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचं यावेळी उघड झालं आहे.
घरात अचानक लागलेल्या आगीमध्ये कागदपत्रे, कपडे लाईट वायरिंग व इतर साहित्य जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद अरुण घोडके यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे.