आठ मशीन्सना पैसे मोजण्यासाठी अपुरे पडले 24 तास, अत्तर व्यावसायिकाच्या घरात पैशांचा ढिग!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना कानपूरच्या अत्तर व्यावसायिकाच्या घरी टाकलेलेल्या धाडीत प्रचंड पैसे मिळाले आहेत. जे पैसे सापडले ते इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की ते मोजण्यासाठी पैसे मोजण्याची आठ मशीन्स आणि अख्खा एक दिवस अपुरा पडला. कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ही धाड टाकण्यात आली.

ADVERTISEMENT

यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना थोडी थोडकी नाही तर 150 कोटींची माया सापडली आहे. इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून पैशांचा ढिग दिसून येतो आहे. हे पैसे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवूनत त्यावर चिकटपट्टी लावल्याचं दिसतं आहे. एका फोटोत कपात नोटांनी खचाखच भरल्याचं दिसतं आहे तर दुसऱ्या फोटोत अधिकारी खाली बसून पैसे मोजत असताना दिसत आहेत. आत्तापर्यंत सापडलेली रक्कम दीडशे कोटींची आहे. एकूण किती पैसे सापडले ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार गुरूवारी ही धाड टाकण्यात आली असून कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरात या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. करचोरी केल्या प्रकरणी ही कारवाई आयकर विभागातर्फे करण्यात येते आहे. तसंच जीएसटीकडूनही कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

कारवाई करण्यात आलेले पियूष जैन हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अखिलेश यादव यांनीच त्यांच्या अत्तराचं लाँचिंग केलं होतं. यावरुन भाजपाने अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. हाच समाजवादी पक्षाचा खरा रंग आहे असं ट्विट उत्तर प्रदेश भाजपाने केलं आहे. समजवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर या फोटोंची आणि या कारवाईची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. हे पैसे अखिलेश यादव यांच्याशी संबंधित व्यापाऱ्याचे आहेत म्हटल्यावर अनेकांनी त्यांनाही ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. हा बघा अखिलेश यादव यांचा समाजवाद असंही काही जणांनी म्हटलं आहे. काही जणांनी या प्रकरणी अखिलेश यादव यांनाही टीकेचं लक्ष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

आत्तापर्यंत या धाडीत 150 कोटी रूपये आढळले आहेत. मात्र पैशांची मोजदाद अद्यापही सुरूच आहे. एखाद्या अत्तर व्यावसायिकाच्या घरी आणि धाडीदरम्यान एवढी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT