चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या ७० दिवसांत पहिल्यांदाच बुधवारी एका दिवसात सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली. रूग्णवाढीचा विचार करता मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नव्या रूग्णांची संख्या तब्बल १ हजार १२४ ने अधिक नोंदली गेली आहे. मंगळवारी ही संख्या ३ हजार ६६३ इतकी होती.

ADVERTISEMENT

७० दिवसांपूर्वी गेल्या ९ डिसेंबरला सर्वाधिक ४,९८१ एवढे कोरोना रूग्ण आढळले होते. त्यानंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्येत झालेली ही वाढ सगळ्यांना काळजीत टाकणारी आहे.

बुधवारी राज्यात एकूण ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही संख्या ३९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.६२ टक्के इतकं आहे.

हे वाचलं का?

ही देखील बातमी वाचा: ‘रुग्ण वाढतायेत, कठोर कारवाई करा’; अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्यातल्या अॅक्टिव्ह रूग्णसंख्येतही मोठी वाढ होताना दिसतेय. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या काळात राज्यातल्या ३६ पैकी २१ जिल्ह्यांतही रूग्णसंख्या वाढते आहे. यापैकी ७ जिल्ह्यात प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कडक करण्यास सुरवात केली आहे.

ADVERTISEMENT

अमरावती, नागपूर, बुलडाणा, यवतमाळ, अकोला, परभणी आणि जालना जिल्ह्यात ५ हून जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

राज्यात सध्याच्या घडीला एकूण ३८ हजार ०१३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ५३० इतकी असून ठाण्यात ही संख्या ४ हजार ६८१, तर पुण्यात ७ हजार ५०९, औरंगाबादेत ७५१, नागपूरमध्ये ५ हजार ०५ इतकी आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात आहे. तर सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोलीत आहे. गडचिरोलीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ५७ इतकी आहे.

या बातमीकडेही द्या लक्ष: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ‘या’ जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी

राज्यात गेल्या आठ दिवसांत २९ हजार ९३६ कोरोना रूग्ण आढळले आहेत. म्हणजेच दररोज सरासरी ३ हजार ७४२ रूग्ण आढळले. पण याआधीच्या २० दिवसात ही सरासरी ३ हजाराच्या खाली होती.

कोविड चाचण्यांची घटलेली संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे कानाडोळा केल्यामुळे रूग्णसंख्येत ही वाढ होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT