सचिन वाझे प्रकरणाची तार मातोश्रीशी – नवनीत राणांचा हल्लाबोल
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं. NIA ने वाझेंना अटक केल्यानंतरही विरोधक सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका करणं थांबवत नाहीयेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही सचिन वाझे प्रकरणाची तार […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं. NIA ने वाझेंना अटक केल्यानंतरही विरोधक सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका करणं थांबवत नाहीयेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही सचिन वाझे प्रकरणाची तार मातोश्रीशी जोडली जात असल्याचं म्हटलंय.
ADVERTISEMENT
“अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार हिरेन यांची होती. पोलीस चौकशीदरम्यान हिरेन यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. ज्याने ही हत्या केली त्यालाच प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. विरोधक जेव्हा वाझेंच्या निलंबनाची मागणी करत होते तेव्हा मुख्यमंत्री एकही शब्द बोलले नाहीत आणि त्यांनी वाझेला पाठींबा दिला. पण आता NIA ने तपास हाती घेतल्यानंतर हे प्रकरण हळुहळु उलगडायला लागलं आहे.” नवनीत राणांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.
या प्रकरणात जे काही झालं आणि सचिन वाझेच्या सर्व तार या मातोश्रीशी जाऊन मिळत आहेत. मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली होते? या प्रकरणाचा चांगला तपास का झाला नाही याची उत्तरं मिळायला हवीत असंही नवनीत राणांनी म्हणलं आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनीही धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आयपीएलमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या बुकींसोबत वाझे यांचे संबंध असून त्यांनी बुकींकडे १५० कोटींची खंडणी मागितल्याचं नितेश राणे म्हणाले. ते भाजपच्या मुंबई कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने वाझेंना अटक केली आहे.
अँटेलिया कार प्रकरण भोवलं, Sachin Vaze पोलीस दलातून निलंबित
ADVERTISEMENT
सचिन वाझे आणि शिवसेनेचं कनेक्शन अधोरिखीत करत भाजप गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेला आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना नितेश राणेंनी गंभीर आरोप केले. “गेल्या वर्षी सप्टेंबर तो नोव्हेंबरच्या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा तरुणांसाठी सुरु केली होती. पण मग इथे बेटींग सुरु झालं. मुंबईत अनेक ठिकाणी मॅचवर सट्टे लावण्याचं काम चालतं. सचिन वाझेंनी या बुकींना फोन करुन तुम्ही कुठे सट्टा लावत आहात, तुमचं लोकेशन कुठे आहे हे आम्हाला सर्व माहिती आहे. जर अटक करुन घ्यायची नसेल तर १५० कोटी द्या नाहीतर मी तुमच्या अड्ड्यांवर छापेमारी करीन. अशा पद्धतीने सचिन वाझे बुकींकडून खंडणी मागत होते.”
ADVERTISEMENT
यावेळी बोलत असताना नितेश राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात संभाषण झाल्याचं सांगितलं. वाझेंनी बुकींना फोन केल्यानंतर सरदेसाईने वाझेंना फोन करुन तुम्ही मागितलेल्या पैशांपैकी आमचा वाटा किती?? अशी विचारणा केल्याचं नितेश राणेंनी सांगितलं. या सर्व संभाषणांचे डिटेल्स NIA ने जाहीर करावे अशी मागणी राणे यांनी केली आहे. सध्या २५ मार्चपर्यंत नितेश राणे NIA कस्टडीत आहे. दरम्यान भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी वाझे प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच खडे बोल सुनावले होते.
‘याच’ CCTV फुटेजनंतर NIA ने केली सचिन वाझेंना अटक, पाहा नवं फुटेज
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT