सुकेश चंद्रशेखरनंतर आता या इटालियन अभिनेत्याला जॅकलिन करतेय डेट? चर्चांना उधाण
बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि हॉट अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चर्चेत असण्याचं कारण सुकेश चंद्रशेखर नाही. तर एक इटालियन अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की जॅकलिन एका इटालियन अभिनेत्याला डेट करते आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांची चौकशीही झाली. अशात आता एका इटालियन अॅक्टरला […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि हॉट अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तिच्या चर्चेत असण्याचं कारण सुकेश चंद्रशेखर नाही. तर एक इटालियन अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की जॅकलिन एका इटालियन अभिनेत्याला डेट करते आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांची चौकशीही झाली. अशात आता एका इटालियन अॅक्टरला जॅकलिन डेट करत असल्याची चर्चा आहे.
जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?
जॅकलिन फर्नांडिस नेमकी कोणत्या इटालियन अभिनेत्याला डेट करते आहे?
बॉलिवूडमध्ये ही जोरदार चर्चा आहे की जॅकलिन फर्नांडिस 365 Days या सिनेमात झळकलेल्या मिशेल मोरोन या अभिनेत्याला डेट करते आहे. जॅकलिन आणि मिशेल या दोघांनी व्हीडिओ साँग मुड मुड के ना देख या व्हीडिओ अल्बममध्ये सोबत काम केलं होतं. त्या गाण्यात या दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहण्यास मिळाली होती. तेव्हापासूनच हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा जोरदार रंगल्या आहेत. हे गाणं साधारण सहा महिन्यांपूर्वी आलं होतं.