IT Raid Dainik Bhaskar: ‘दैनिक भास्कर’ मीडिया ग्रुपवर आयकर खात्याने का केली छापेमारी?, नेटीझन्स म्हणतात…
भोपाळ: दैनिक भास्कर या मीडिया ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने गुरुवारी एकाच वेळी छापा टाकले. कथित कर चोरीसंदर्भात हे छापा टाकण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांकडून यावेळी देण्यात येत आहे. भोपाळ, जयपूर आणि अहमदाबादसह देशातील इतर काही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT)कोणतेही […]
ADVERTISEMENT

भोपाळ: दैनिक भास्कर या मीडिया ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाने गुरुवारी एकाच वेळी छापा टाकले. कथित कर चोरीसंदर्भात हे छापा टाकण्यात आले असल्याची माहिती आयकर विभागातील सूत्रांकडून यावेळी देण्यात येत आहे.
भोपाळ, जयपूर आणि अहमदाबादसह देशातील इतर काही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT)कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अनेक राज्यात चालणार्या या छाप्यांमध्ये हिंदी माध्यमांच्या मोठ्या समूहांचे प्रमोटर देखील सहभागी आहेत.
भास्कर ग्रुपवर IT कडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘एजन्सी आपले काम करत आहे. सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. दुसरे म्हणजे लोकांनी प्रथम सर्व माहिती तपासली पाहिजे, तरच त्यांनी काहीतरी बोलावे.’