ITR Filing : करदात्यांना केंद्राचा दिलासा; प्राप्तिकर परतावा भरण्याला मुदतवाढ

मुंबई तक

केंद्र सरकारकडून प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने इन्कम टॅक्स इंडिया या ट्विटर हॅण्डलवरून याची माहिती दिली. कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आयकर भरण्याची मुदत आधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कालावधी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्र सरकारकडून प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने इन्कम टॅक्स इंडिया या ट्विटर हॅण्डलवरून याची माहिती दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने आयकर भरण्याची मुदत आधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कालावधी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

सीबीडीटीने २०२१-२२ या वर्षासाठी प्राप्तीकर परतावा आणि ऑडिटची वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे. आयकर कायदा, १९६१ नुसार २०२१-२२ साठी प्राप्तिकर परतावा आणि ऑडिटचे वेगवेगळे रिपोर्ट दाखल करण्यास करदात्यांसह इतरांना रिपोर्ट दाखल करण्यास अडचणी येत आहेत.

भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) वर्ष २०२१-२२ साठी प्राप्तीकर रिटर्न आणि ऑडिटसह विविध रिपोर्ट्स दाखल करण्याच्या निर्धारित तारखांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp