Janmashtami 2022 date : 18 की 19 ऑगस्ट… जन्माष्टमी नक्की कधी आहे?

मुंबई तक

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. पौराणिक माहितीनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला दिवशी रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाचा वासुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव भारतात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. पण, जन्माष्टमीच्या तारखेवरून यंदा अनेकांचा गोंधळ झाला आहे. १८ ऑगस्ट की १९, जन्माष्टमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. पौराणिक माहितीनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला दिवशी रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाचा वासुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव भारतात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. पण, जन्माष्टमीच्या तारखेवरून यंदा अनेकांचा गोंधळ झाला आहे.

१८ ऑगस्ट की १९, जन्माष्टमी नक्की कधी?

भारतातील विविध भागांत पारंपरिक पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा जन्माष्टमी १८ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. त्यामुळे देशभर श्रीकृष्ण भक्तीने वातावरण भारावून गेलं आहे.

जन्माष्टमीच्या तारखेवर लोकांमध्ये गोंधळ का झालाय?

यंदा जन्माष्टमी १८ ऑगस्ट रोजीच आहे, मात्र काही लोक असं म्हणताहेत की, जन्माष्टमी १९ ऑगस्ट रोजी आहे. जन्माष्टमीच्या तारखेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर ज्योतिषाचार्य डॉ. विनोद यांनी सांगितलं की, ‘यावर्षी जन्माष्टमीच्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.’

‘श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला होता. हा योग १८ ऑगस्ट रोजी जुळून येतोय. पण, काही लोकांचं असं मत आहे की, १९ ऑगस्ट रोजी पूर्ण दिन अष्टमी तिथी राहिल आणि याच तिथीला सूर्योदयही होईल. त्यामुळे जन्माष्टमी १९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.’

हे वाचलं का?

    follow whatsapp