JEE Main Result 2021: निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना रँक वन, महाराष्ट्राचा अथर्व तांबट अव्वल
जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर (JEE Main 2021 result announced) करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वन रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट (Atharva Abhijeet Tambat) या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. […]
ADVERTISEMENT
जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर (JEE Main 2021 result announced) करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वन रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट (Atharva Abhijeet Tambat) या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र 20-25 जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र 26 ऑगस्ट ते 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.
National Testing Agency (NTA) releases JEE Main results; 44 candidates get 100 percentile, 18 candidates on rank 1 pic.twitter.com/GO8vEfaZCd
— ANI (@ANI) September 14, 2021
कसा पाहाल निकाल?
हे वाचलं का?
अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
होम पेजवर ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लि करा
ADVERTISEMENT
तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा
ADVERTISEMENT
माहिती भरल्यानंतर सबमिट करा
चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल
तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या
या वेबसाईटवर पाहू शकता निकाल
nta.ac.in,
ntaresults.nic.in,
jeemain.nta.nic.in
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT