कल्याणच्या टिटवाळा भागात सराफ व्यवसायिकाला लुटलं, १ कोटी २० लाखांचे दागिने पळवले
कल्याणच्या टिटवाळा भागात अज्ञात चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. हा सराफ मुंबईवरुन सोन्याच्या दागिन्यांची डिलीव्हरी देण्यासाठी टिटवाळा भागात आला होता. यावेळी वाटेत गाडी पंक्चर झालेली असताना टायर बदलत असतानाची वेळ साधत चोरट्यांनी १ कोटी २० लाखांचे दागिने असलेली पिशवी पळवून नेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पिशवीत दागिने आणि रोख रक्कम होती. […]
ADVERTISEMENT
कल्याणच्या टिटवाळा भागात अज्ञात चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. हा सराफ मुंबईवरुन सोन्याच्या दागिन्यांची डिलीव्हरी देण्यासाठी टिटवाळा भागात आला होता. यावेळी वाटेत गाडी पंक्चर झालेली असताना टायर बदलत असतानाची वेळ साधत चोरट्यांनी १ कोटी २० लाखांचे दागिने असलेली पिशवी पळवून नेली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार या पिशवीत दागिने आणि रोख रक्कम होती. मुंबईच्या लालबाग भागातील या सराफ व्यवसायिकाला दोन अज्ञात चोरट्यांनी लुबाडलं आहे. राकेश अंबालाल जैन या लालबागच्या सराफाने घडणावळ केलेले सोन्याचे दागिने टिटवाळा बाजारपेठेतील सोनारांना विकण्यासाठी आणले होते. ते कारमधून मंगळवारी संध्याकाळी टिटवाळ्यात आले होते. रिजन्सी हॉटेलजवळ त्यांनी कार उभी केली आणि काही दागिने एका सोनाराला देऊन ते पुन्हा कारजवळ आले. यावेळी त्यांना कारचा टायर पंक्चर झाल्याचं कळलं.
याला म्हणातात Instant Karma ! दागिने चोरुन बाहेर पळणारा चोर अडकला भिंतीच्या होलमध्ये
हे वाचलं का?
गाडीचा चालक आणि सराफ व्यवसायिक जैन टायर बदलत असतानाच चोरट्यांनी संधी साधत गाडीत ठेवलेली दागिन्यांची पिशवी पळवली. यावेळी जैन यांनी आरडाओरड करत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान या प्रकरणात टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
चुकीला माफी नाही ! पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आईने मुलाला धाडलं तुरुंगात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT